महत्वाच्या बातम्या

 भटक्या विमुक्त जमातीमधील नागरिकांची मतदार नोंदणी करुन घ्यावी : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- मतदार नोंदणी बाबत ऑनलाईन बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : भटक्या विमुक्त जमाती मधील मतदारांसाठी ५ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करुन त्यांनी नावे मतदार यादीत समाविष्ठ करुन घ्यावे. त्याचबरोबर त्यांना आवश्यक असल्यास रेशन कार्ड, जात प्रमाणपत्र तयार करुन द्यावे तसेच संजय गांधी योजनेच्या लाभार्थीचा शोध घेऊन  आवश्यक सुविधा पुरवाव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी दिले.

जिल्हाधिकारी कर्डिले यांनी जिल्ह्यातील चारही मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिका-यांची आँनलाईन बैठक घेतली. त्यावेळी त्यांनी या सूचधा दिल्या. बैठकील उपजिल्हा निवडणूक अधिकारी अनिल गावीत, वर्धा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, हिंगणघाट मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले, आर्वी  मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विश्वास शिरसाट, देवळी मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी प्रियांका पवार, समाज सेवक पि.के.बमनोटे, ताराचंद माहुरे उपस्थित होते.

भटक्या विमुक्त जमातीचे नागरिक, समाज सेवकांनी यासाठी मतदार नोंदणी अधिकारी यांना सहकार्य करावे, असे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले म्हणाले. जिल्ह्यात २३ समाजसेवकांची यादी तयार करण्यात आली असून एकूण २२ ठिकाणे व वस्ती ज्या ठिकाणी भोई, गोंधळी, बेलदार, शिख, बहुरुपी, नाथजोगी, बुरड, मुस्लीम मदारी, पारधी, काठीयावाडी इत्यादी समाजाच्या जागा यांचा शोध घेण्यात आला असून त्या ठिकाणी ५ ते ८ ऑक्टोंबर दरम्यान विशेष शिबिराचे आयोजन करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

यावेळी देवळी तालुक्यात पुलगाव व वर्धा येथे मदारी मुस्लीम समाज, पुलगाव येथे गोंधळी, देवळी येथे भोई व गोंधळी, सेलु तालुक्यात केळझर येथे बेलदार, वडार, गोंधळी, पारधी व बहुरुपी, हमदापुर शिवनगर चानकी येथे बहुरुपी, धपकी चारमंडळ व जंगलापूर येथे नाथजोगी, सिंदी रेल्वे व सिंदी मेघे येथे मदारी मुस्लीम समाज, मदनी येथे बेलदार, वडार समाज, आर्वी नाका व सावंगी मेघे येथे गोंधळी, बुरड, सेवाग्राम पुलाजवळ काठीयावाडी, रसुलाबाद जून्या बसस्टॅडजवळ गोंधळी, बुरड व बेलदार, पिंपळखुटा येथे भोई समाज, गोंधळी व बेलदार, कवाडी व वर्धमनेरी येथे भोई समाज, गोंधळी, तळेगाव येथे शिख वस्ती, हिंगणघाट तालुक्यात चिंचोली, समुद्रपूर तालुक्यात बसस्टॅड जवळ बहुरुपी समाजाच्या वस्ती आहे, असे बैठकीत अनिल गावीत यांनी सांगितले.





  Print






News - Wardha




Related Photos