महत्वाच्या बातम्या

 गुणवत्ता प्रमाणन- पुढील वाटचाल राज्यस्तरीय परिषदेमध्ये गोंडवाना विद्यापीठाचा सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन, रुसा महाराष्ट्र व मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने गुणवत्ता प्रमाणन- पुढील वाटचाल या एक दिवसीय राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन मुंबई येथे करण्यात आले होते.         

संबंधित विभागातील शासकीय पदाधिकारी, राज्यातील १३ अकृषक व 2 खाजगी विद्यापीठ, व165हून अधिक महाविद्यालयांचा सहभाग या परिषदेमध्ये होता. परिषदेअंतर्गत राज्यातील सर्व विद्यापीठांना त्यांच्या उत्कृष्ट उपक्रमांचे प्रदर्शन करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. त्यामध्ये 15 विद्यापीठातर्फे एकूण 22 सर्वोत्कृष्ट उपक्रम प्रदर्शित करण्यात आले. त्यामध्ये गोंडवाना विद्यापीठातर्फे सामुदायिक प्रतिबध्दता, सामुदायिक उद्योजकता, समाजकार्यातील व्यसनमुक्ती वर आधारित स्पार्क अभ्यासक्रम व एकल ग्रामसभा सहभागातून सक्षमीकरण प्रशिक्षण अशा चार सर्वोत्कृष्ट उपक्रमांचे पोस्टर्स प्रदर्शित करण्यात आले. सदर पोस्टर प्रेसेंटेशन मधून स्थानिक गरज ओळखून व राष्ट्रीय शिक्षा धोरण 2020 ला अनुसरून असल्यामुळे सर्व सहभागी संबंधितांकडून कौतुक करण्यात आले. सदर परिषदे करिता विद्यापीठाचे प्रतिनिधित्व गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. धनराज पाटील आणि संचालक नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य डॉ. मनिष उत्तरवार यांनी केले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos