मंजूर रस्ता सोडून केले दुसऱ्याच रस्त्याचे काम


कंत्राटदाराचा प्रताप, गावकऱ्यांचा पत्रकार परिषदेतुन  आरोप 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी /  भामरागड :
तालुक्यातील हिदुर गावातील मंजूर रस्त्याचे काम न करता दुसऱ्याच रस्त्याचे काम करण्याचा प्रताप कंत्राटदाराने केला. त्यामुळे गावकऱ्यांनी कंत्राटदाराविरोधात पत्रकार परिषद घेऊन रोष  व्यक्त करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.                                                   तालुका मुख्यालयापासून ८ कि.मी.अंतरावरील हिदुर हे आरेवाडा ग्रामपंचायत अंतर्गत येणारे संपूर्ण आदीवासी ३५ कुटुंबाचे गाव. प्रधानमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत हिदुर ते हितापाडी हा साडेतीन कि.मी.चा रस्ता मंजूर झाला. मात्र सदर रस्ता न बनविता कंत्राटदाराने आरेवाडा ते हितापाडी रस्ता बनविला. रस्त्याच्या सुरुवातीला व शेवटी मात्र हिदुर ते हितापाडी रस्ता बांधकाम असा फलक लावला.सदर हिदुर ते हितापाडीचा रस्ता २०१७-१८ मध्ये मंजूर झाला. कार्यारंभ आदेश  २७ नोव्हेम्बर २०१८ असून कामाची मुदत  २६ ऑगस्ट २०१९ आहे. पाच वर्ष देखभाल व दुरुस्तीसह अमलबजावणी पथक गडचिरोली  म. शा.ग्राम विकास मंत्रालय भारत सरकार अशा आशयाचा फलक लावण्यात आलेला आहे. मात्र मंजूर रक्कमेचा फलकांवर उल्लेख केलेला नाही.हिदुर ते हितापाडी साडेतीन कि.मी.चे अंतर आहे आणि आरेवाडा ते हितापाडी हे अंतर पाच कि.मी.चे आहे. कंत्राटदारांनी साडेतीन कि.मी.चे काम केले. उर्वरित दिड कि.मी.चे भिजत घोंगडे राहणार आहे . हिदुर ते हितापाडी रस्ता न बनविता दुसराच रस्ता बनविल्यामुळे कंत्राटदाराच्या प्रतापाविरोधात हिदुरवासियांनी पत्रकार परिषद घेऊन सदर कामाची चौकशी करुन गावकऱ्यांना न्याय देण्याची मागणी केली आहे. आमचा रस्ता न बनविल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा हिदूर वासियांनी दिला आहे .सदर पत्रकार षरिषदेला केशव परसा,साधू परसा,पांडू तिम्मा,मेंगा गावडे,जुरू माडकामी,पांडू नरोटी,कोपा आलाम,विज्जा परसा,रामा विडपी,कुम्मा पुसाली,दोगे पुसाली,विनोद परसा,रैनू वड्डे,इत्यादी गावकरी उपस्थित होते.          
 
- मला ग्रामपंचायत व हितापाडीच्या गावकऱ्यांनी हितापाडी ते आरेवाडा रस्ता बनविण्यास पत्र दिले.तसेच संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा हितापाडी ते आरेवाडा रस्ताच बनविण्याचे निर्देश दिले.त्यामुळे मी हिदुर ते हितापाडी रस्ता न बनविता हितापाडी ते आरेवाडा रस्त्याच्या कामाला सुरूवात केली, अशी माहिती कंत्राटदाराने दिली आहे.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-22


Related Photos