शहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण


- आमदार किर्तीकुमार भांगडिया यांची उपस्थिती 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर : 
चिमूर- कांपा मुख्य मार्गावरील शहीद बालाजी रायपूरकर चौकात गेली अनेक वर्षांपासून राष्ट्रीय सण साजरा होत असताना ध्वजारोहण केल्या जात आहे .  स्वातत्र दिनाचे औचित्य साधून शहीद बालाजी रायपूरकर यांच्या अर्धकृती पुतळ्याचे अनावरण आमदार किर्तीकुमार भांगडिया यांच्या उपस्थितीत करण्यात आले.  
 चिमूर- कांपा मुख्य मार्गावरील जुन्या डोंगरावार चौकात गेली अनेक वर्षांपासून ध्वजारोहण केल्या जात आहे . या चौकाचे नामकरण शहीद बालाजी रायपूरकर चौक करण्यात आले.  येथील युवक समिती च्या वतीने राष्ट्रीय सण निमित्य स्वातत्रदिन व  गणराज्य दिना निमित्य ध्वजारोहण केले जात आहे. या चौकात शहीद बालाजी रायपूरकर अर्धकृती पुतळा व्हावे यासाठी आमदार किर्तीकुमार भांगडिया यांनी ही मागणी तात्काळ मंजूर करून आपल्या स्वखर्चातून आर्थिक निधी दिले आहे . 
 यावेळी जेष्ठ नागरिक गजानन अगडे, राजू लोणारे , रमेश कराळे, योगेश ढोणे , प्यारा बावनकर, नैनेश पटेल उपस्थित होते 
 अनावरण सोहळा यशस्वी करण्यासाठी शुभम भोपे ,अमेय नाईक हरीश कोरामे ,गोलू तराळे ,संदीप दुधनकर ,स्पनील गटलेवार सतीश ठाकूर आदींनी परिश्रम घेतले.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-08-17


Related Photos