जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार, संबंधितांवर गुन्हे दाखल होणार


- गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागात कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले असून या प्रकरणी गडचिरोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. तक्रारीवर कारवाई सुरू असून दोषींवर गुन्हे दाखल केले जाईल, अशी माहिती पोलिस निरीक्षक प्रदिप चौगावकर यांनी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या सिंचाई विभागामार्फत अनेक कामे करण्यात आली आहेत. यामध्ये अंदाजे पावणे तीन कोटींच्या जवळपास रक्कमेचा गैरव्यवहार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या वर्तूळात खळबळ निर्माण झाली आहे. 

 
  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-09-19


Related Photos