गुजरातमध्ये दोन ट्रकच्या मध्ये चिरडून १० जण ठार


वृत्तसंस्था / अहमदाबाद :  कच्छ जिल्ह्यात झालेल्या अपघातात कार दोन ट्रकच्या मधे आल्याने एकाच कुटुंबातील १० जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. रविवारी भचाऊ येथे हा अपघात झाला. कुटुंबातील सर्व सदस्य एसयूव्ही कारमधून प्रवास करत होते.  
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भचाऊ येथील महामार्गावर हा अपघात झाला. मीठाने भरलेल्या ट्रेलरने दुभाजक ओलांडला आणि चालक चुकीच्या दिशेने ट्रेलर नेऊ लागला. त्याचवेळी एसयूव्ही कारला त्याने धडक दिली. कारमधून एकूण ११ जण प्रवास करत असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. ट्रेलरने धडक दिल्यानंतर त्याचवळी मागून येणाऱ्या ट्रकनेही कारला ठोकलं ज्यामध्ये १० जणांचा जागीच मृत्यू झाला. सर्व पीडित भचाऊ येथून गुजरातमधील आपल्या घरी भूज येथे चालले होते तेव्हा हा दुर्दैवी अपघात झाला.   Print


News - World | Posted : 2018-12-31


Related Photos