सेवा सहकारी सोसायट्यांना तीन लाखापर्यंत कामाचे वाटप होणार


विदर्भ न्युज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार बेरोजगारांच्या सेवा सोसायट्यांना विना निविदा तीन लाखापर्यंतची कामे जिल्हा कामवाटप समितीव्दारे देण्याचा निर्णय घेतला आहे. निरनिराळ्या शासकीय, निमशासकीय महामंडळांना त्यांच्याकडील तीन लाखापर्यंतची कामे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर यांना कळविण्यात यावी. जेणेकरून कामवाटप समितीमार्फत बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांना योग्यरीत्या कामवाटप करता येईल, असे आवाहन करण्यात आले आहे.
बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांच्या प्रवर्तकांनाही आपल्या बेरोजगारांच्या सेवा सहकारी सोसायट्यांची माहिती सेवा सोसायटीचे नाव, नोंदणी क्रमांक, वर्ष, प्रवर्तकाचे नाव, अंकेक्षण अहवाल सादर केला किंवा नाही, योग्य ई-मेल आयडी व व्हाट्सअँप कमांक त्वरित जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नागपूर या कार्यालयाच्या nagpurrojgar@gmail.com मेलवर ४ नोव्हेंबरपर्यंत कळविण्यात यावा, असे सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रातर्फे कळविण्यात आले आहे.
News - Chandrapur