महत्वाच्या बातम्या

 सीडीसीसी बँक अपहार प्रकरणातील दोषी रोखपालास सक्त सश्रम कारावासाची शिक्षा


- ३ कोटी ६३ लक्ष ३९ हजार ८६० रुपयाच्या मोठया अपहाराच्या प्रकरणात न्यायालय व उच्च न्यायालयाने ६ महिन्याच्या मुदतीत ३४ साक्षदार तपासून ४६ पानाचे दिले निकालपत्र  

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : पोलीस स्टेशन रामनगर येथे रजनी संजय सपाटे, बँक व्यवस्थापक चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सीडीसीसी शाखा, जिल्हा परिषद चंद्रपूर यांच्या रिपोर्ट नुसार, त्यांच्या बँकेत रोखपाल या पदावर कार्यरत असलेले निखील अशोक घाटे यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून बँकेतील खातेदारांनी त्यांच्या खात्यात जमा केलेली रक्कम बँकेच्या रेकॉर्डवर न घेता त्या रक्कमा स्वतःकडे ठेवून खातेदार व बँकेचा विश्वासघात करून एकुण ६९ लाख ६७ हजार ८०५ रुपयांचा अपहार केला. यावरुन आरोपीविरुद्ध पोलीस स्टेशन रामनगर येथे अपराध क्रमांक १७२/ २०२१ कलम ४०९, १०९, २०१, ३४ भादंविचा गुन्हा नोंद करण्यात आला. 

सदर गुन्ह्यातील अपहाराची रक्कम तीन कोटी पेक्षा जास्त असल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी गुन्हयाचा तपास आर्थीक गुन्हे शाखा, चंद्रपूर येथे केला असता, सदर गुन्हयाचा तपास आर्थीक गुन्हा शाखेने विहीत मुदतीत पुर्ण करुन गुन्हयात आरोपी निखील अशोक घाटे (३८) रा. विठठल मंदीर वार्ड चंद्रपूर याने एकुण ३ कोटी ६३ लाख ३९ हजार ८६० रुपयाचा अपहार केल्याचे निष्पन्न झाल्याने आरोपीविरुध्द दोषारोपपत्र प्रथम श्रेणी न्यायालय चंद्रपूर यांच्या न्यायालयात दाखल करण्यात आले.

सदर प्रकरणात उच्च न्यायालय मुंबई खंडपिठ नागपूर द्वारे ६ महिन्याच्या मुदतीत निर्णय देण्याचे आदेश पारीत झाल्याने प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ऋषीकेश दिपक हिंगणगांवकर यांनी गुन्हयाचे तपासातील उपलब्ध दस्तावेज पुरावा, हस्ताक्षर तज्ञांचा अहवाल, सायबर तज्ञांकडील तांत्रीक पुरावे आणि तपासातील एकुण ३४ साक्षदार तपासले असता त्यात बँक अधिकारी/कर्मचारी, हस्ताक्षर तज्ञ, सायबर तज्ञ यांची साक्ष महत्वाची ठरल्याने न्यायालयाने आरोपी निखील अशोक घाटे यास कलम ४०९ भादंवि अन्वये ३ वर्ष सक्त मजुरी, तसेच कलम २०१ भादंवि मध्ये दिड वर्ष सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. 

सदर निकाल पत्रात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ऋषीकेश दिपक हिंगणगांवकर यांनी आरोपीने २ कोटी ८६ लाख १२५ रुपये वापरुन त्याचा अपहार केला. परंतु सदर रक्कम आरोपीकडुन मिळाल्याने २ कोटी ८६ लाख १२५ रुपयाची नुकसान भरपाई भरण्यास आदेशीत केले आहे.

३ कोटी ६३ लाख ३९ हजार ८६० रुपयाच्या मोठया अपहाराच्या प्रकरणात शिक्षा देतांना न्यायालयाने ४६ पानाचे निकाल पत्र दिलेले असुन उच्च न्यायालयाने दिलेल्या ६ महिन्याचे मुदतीचे आंत ३४ साक्षदार पासुन प्रकरण निकाली काढले आहे.

सदर प्रकरणात शेखर देशमुख, पोलीस उपअधिक्षक आर्थीक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनात पोउपनि किरण मेश्राम, पोहवा संजय नेरकर, गजानन निमकर, अरविंद तिराणकर, नापोशि प्रभाकर तलांडे आर्थीक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पो. हवा. मुजावर अली सायबर पोलीस स्टेशन चंद्रपूर यांनी गुन्हयाचा उत्कृष्ट रित्या तपास करुन आरोपीविरुध्द दोषारोपपत्र न्यायालयात सादर प्रकरणाचा पाठपुरावा केला आहे.

सदर गुन्हयात न्यायालयात सरकार तर्फे विशेष सरकारी वकील म्हणुन ममता बुजाडे यांनी काम पाहिले, असुन कोर्ट मोहर पोहवा प्रविण आत्राम यांनी पैरवी अधिकारी म्हणुन कामकाज पाहुन दोषसिध्दीस मोलाचे सहाय्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos