इंधन दरवाढ सुरूच, नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपये


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / नागपूर : इंधनाच्या दरात वाढ सुरुच असून गुरुवारी मुंबईत पेट्रोल प्रति लिटरमागे १९ पैशांनी तर डिझेल प्रति लिटरमागे २२ पैशांनी महागले. तर नागपुरात पेट्रोल ८७. ३९ रुपये तर डिझेल ७६. ४९ रुपयांवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चा तेलाच्या किंमतीत झालेली वाढ आणि रुपयाचे अवमूल्यन यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत.
मुंबईत गुरुवारी पेट्रोलने एका लिटरसाठी ८६. ९१ रुपये इतका दर गाठला. तर डिझेलने एका लिटरसाठी ७५. ९६ रुपये इतका दर गाठला. दिल्लीतही पेट्रोल २० पैशांनी तर डिझेल २१ पैशांनी महागले. दिल्लीत पेट्रोलचे दर प्रति लिटर ७९. ५१ रुपये तर डिझेलचे दर प्रति लिटर ७१. ५५ रुपये इतके आहे.
प्रत्येक महिन्याच्या १ आणि १६ तारखेला इंधनदरांचा आढावा घेण्याची पद्धत इंडियन ऑइल, भारत पेट्रोलियम आणि हिंदुस्तान पेट्रोलियमने गेल्या वर्षी जूनमध्ये मोडीत काढली. तेव्हापासून दररोज सकाळी ६ वाजता इंधनदराचा आढावा घेण्याची पद्धत सुरू आहे. त्यानुसार नवी इंधन दरवाढ जाहीर करण्यात आली.
राज्यातील प्रमुख शहरांमधील दर (प्रति लिटरनुसार)
पुणे
पेट्रोल – ८६. ७१ रुपये
डिझेल – ७६. ४० रुपये
नागपूर
पेट्रोल – ८७. ३९ रुपये
डिझेल – ७६. ४९ रुपये
औरंगाबाद
पेट्रोल – ८७. ९६ रुपये
डिझेल – ७७. ०२ रुपये
News - Nagpur | Posted : 2018-09-06