महत्वाच्या बातम्या

 मतदानाच्या दिवशी सुट्टी न दिल्यास होणार कारवाई


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / मुंबई : उद्योग समूह, महामंडळे, कंपन्या व संस्था, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापनांतील कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी भरपगारी सुटी अथवा सवलत न दिल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास संबधित आस्थापनांवर कारवाई केली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

लोकसभेसाठी मुंबई आणि परिसरात २० मे रोजी मतदान होणार आहे. विविध आस्थापनांत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या दिवशी मतदानासाठी सुट्टी वा दोन तासांची सवलत देण्याच्या सूचना आहेत. ज्या आस्थापनांना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल अशा आस्थापनांनी दोन तासांची सवलत मतदारांना द्यावी मात्र त्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची परवानगी घेणे आवश्यक राहील. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी हे परिपत्रक काढण्यात आले असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.





  Print






News - Rajy




Related Photos