झारखंड मधील राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी उंचावला महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा
:   झारखंड राज्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय एकात्मता शिबिरात महाराष्ट्रातील रासेयो स्वयंसेवकांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची मान उंचावली आहे. 
भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय, पटना बिहार यांच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फाउंड्री एण्ड फोर्ज टेक्नॉलॉजी हटिया, रांची, झारखंड येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर ६ डिसेंबर ते १२ डिसेंबर  पर्यंत   आहे.  या शिबिरात संपूर्ण भारतातून राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा राज्यातील स्वयंसेवक सहभागी झालेले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र हे एक राज्य आहे. सदर शिबिरामध्ये  महाराष्ट्र राज्याच्या रासेयो संघाचे संघनायक श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा चे  रासेयो कार्यक्रम अधिकारी    प्रा. गुरुदास डी. बल्की  यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित विविध महाविद्यालयातील आठ विद्यार्थी या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ म्हणून सहभागी झालेले आहेत. सदर शिबिराच्या उद्घाटनाच्या दिवशी सांस्कृतिक कार्यक्रमात  रेश्मा राखडे हिने महाराष्ट्राची लावणी करून प्रेक्षकांची मने जिंकली.  तसेच दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित पोवाडा सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. या पोवाड्यात सुरज देशकर यांनी शिवाजी महाराज यांची व्यक्तिरेखा तर अभिषेक शर्मा यांनी अफझल खानाची व्यक्तिरेखा सादर केली.  तसेच या पोवाड्यात सोबत  पल्लवी वऱ्हाटे,  रेश्मा राखडे, धनश्री कावरे,  राजनोती कोरेटी, गुलाब राऊत, रमेश रॉय यांनी सहभाग घेतला.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर  तसेच रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी यांच्या मार्गदर्शनाखाली सदर शिबिरात स्वयंसेवकांनी भाग घेतला.   Print


News - Chandrapur | Posted : 2018-12-08


Related Photos