ब्रम्हपूरी शहरात विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांच्या हस्ते ५ कोटींच्या रस्ता बांधकामांचे भूमिपूजन संपन्न
- समस्या संपुष्टात - अंतर्गत मार्ग होणार वाहतुकीस सुकर
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / ब्रम्हपूरी : राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विकासाचा धंदावर कायम ठेवत मतदारसंघात कोट्यावधींची विकास कामे खेचून आणली. यात ब्रम्हपूरी शहरात मोठ्या प्रमाणात विकासकामे पुर्णत्वास आली असून काही विकासकामे प्रगतीपथावर आहेत. परंतु यामध्ये नव्याने शहरातील विविध प्रभागात रस्त्यांचे डांबरीकरणाच्या करण्यासाठी राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांच्या विशेष प्रयत्नांतुन निधी मंजूर झाला असून या विकासकामांचे भूमिपूजन पार पडले आहे.
ब्रम्हपूरी शहरातील आनंदनगरी, गजानननगरी व संताजी नगरी येथील अंतर्गत रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण (५५ लक्ष रू.), शेषनगर येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण (३० लक्ष रू.), शिवाजी महाराज चौक ते तहसीलदार यांच्या निवासस्थाना पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (२० लक्ष रू.), फवारा चौक ते खुळशिंगे सलून पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (२० लक्ष रू.), दामोधर मिसार यांच्या घरापासून ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, अलंकार टाॅकिज ते गहाणे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, दत्त मंदिर ते अशोक कराणकर यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (५० लक्ष रू.), अलगदेवे ते जोशी, मासुरकर ते पाटील, धोंगडे ते निहाले, मेहेर ते कावळे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे (३५ लक्ष रू.), लेंडारा तलाव पाळ रस्त्यावर डांबरीकरण (२० लक्ष रू.), बंटी श्रीवास्तव यांच्या घरापासून ते रेल्वे क्रॉसिंग पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (२० लक्ष रू.), ज्ञानेशनगर येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, पंढरी खानोरकर ते हेमंत उरकुडे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, सिध्देश भर्रे यांच्या दुकानापासुन आरमोरी रोड पर्यंत डांबरीकरण (२०लक्ष रू.), बाजार समिती ते बोंडेगाव पर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करणे(५० लक्ष रू.), बबलू कुंभारे ते विजय पाटील यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (२५ लक्ष रू.), समता कॉलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण (३५ लक्ष रू.), दिघोरे ते इंदिराबाई मिश्रा यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (२५ लक्ष रू.), टिकले ते ठक्कर, कुर्झा काॅर्नर ते जगनाडे चौक, विलास मेश्राम ते गौरव लाखे, देवानंद बिलवणे ते विक्रम कावळे यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण (९० लक्ष रू.), पराते ते कब्रस्तान पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, प्रकाश कळमकर ते मोरेश्वर हटवार यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण, शारदा काॅलनी येथील अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण, हिरालाल कुंभरे ते यशवंत गायकवाड, दुर्योधन जांभुळकर ते रविंद्र गायकवाड, विजय कावळे ते दिनेश गायकवाड यांच्या घरापर्यंत रस्त्याचे डांबरीकरण करणे या विकासकामांचा समावेश आहे.
यावेळी प्रामुख्याने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, बाजार समितीचे सभापती प्रभाकर सेलोकर, माजी जि.प.सदस्य डॉ.राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, न.प.माजी बांधकाम सभापती विलास विखार, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष मोंटु पिलारे, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, माजी न.प.सभापती महेश भर्रे, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुरज मेश्राम, माजी नगरसेवक जगदीश आमले, सरपंच उमेश धोटे, बाजार समिती संचालक किशोर राऊत, बाजार समितीचे संचालक प्रशांत उराडे, बाजार समितीचे माजी संचालक वामन मिसार, वकार खान, युवक काँग्रेसचे विधानसभा उपाध्यक्ष अमित कन्नाके, प्रा.डि.के.मेश्राम, मुन्ना रामटेके, प्रा.चंद्रशेखर गणवीर, लक्ष्मण जिभकाटे, अतुल राऊत, रवी पवार, प्रकाश खोब्रागडे, गुड्डू बगमारे, सरपंच सुरेश दुनेदार यांच्यासह विविध प्रभागातील नागरिक यावेळी उपस्थित होते.
News - Chandrapur