आयकर परतावा मिळेल २४ तासांत


वृत्तसंस्था /  नवीदिल्ली :   करदात्यांना २४ तासांच्या आत आयकर परतावा मिळण्यासाठी महसूल विभागाने प्रयत्न सुरू केले आहेत. पुढील २ वर्षांत महसूल विभाग एक विशिष्ट यंत्रणा विकसित करून आयकर परतावा २४ तासांत मिळेल याची तजवीज करणार आहे. 
मागील महिन्यातल केंद्र सरकारने केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सीबीडीटी) च्या माहिती तंत्रज्ञान सोयीसुविधेच्या अद्ययावतीकरणासाठी ४,२०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. हे अद्ययावतीकरण परतावे, छाननी, पडताळणी आदींसाठी केले जाणार आहे. 
महसूल सचिव अजय भूषण पांडे म्हणाले, 'सध्या परताव्याचं काम स्वयंचलित ऑनलाइन यंत्रणेने होते. यावर्षी दीड लाख कोटी रुपयांचा रिफंड थेट करदात्यांच्या बँक खात्यांमध्ये पाठवण्यात आला होता. आता याच प्रक्रियेचे नूतनीकरण केले जात आहे, जेणेकरून करदात्यांना २४ तासांच्या आत कर परतावा मिळेल.'  ही प्रक्रिया सुरू असून येत्या दोन वर्षांत लागू होईल, असंही पांडे म्हणाले. २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असताना अर्थमंत्री पीयूष गोयल म्हणाले होते की आयकर विभागाची परतावे, रिफंड, ग्राहक तक्रारी आदी सर्व कामे आता ऑनलाइन होत आहेत.   Print


News - World | Posted : 2019-02-05


Related Photos