विद्यार्थिनीचा विनयभंग प्रकरण, मुख्याध्यापक, अधीक्षिका आणि आरोपींवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी आविस करणार चक्काजाम


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / पेरमिली (अहेरी) :
अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील शासकीय आश्रमशाळेच्या विद्यार्थिनीचा पाच जणांनी विनयभंग केल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर संतप्त झालेल्या आविस पदाधिकाऱ्यांनी आरोपी तसेच मुख्याध्यापक, अधिक्षिका यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी चक्काजाम करण्याचा इशारा दिला आहे.
आज पेरमिली येथे आविसने बैठक आयोजित करून विनयभंग प्रकरणाबाबत कठोर भूमिका घेतली. आश्रमशाळा व्यवस्थापनाचे दूर्लक्ष असल्यामुळे विद्यार्थी बाहेर भटकतात. यामुळे याआधीसुध्दा अशा घटना घडल्या आहेत. यामुळे मुख्याध्यापक तसेच अधिक्षिकेवर कारवाई करावी, आरोपींना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. कारवाई न केल्यास उद्या ३० आॅक्टोबर रोजी चक्काजाम करू असा इशारा दिला आहे. यावेळी सरपंच प्रमोद आत्राम, उपसरपंच साजन गावडे, सामाजिक कार्यकर्ता श्रीकांत बंडमवार, अविनाश कोंडागुर्ले, तुळशिराम चंदनखेडे तसेच आविस पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-10-29


Related Photos