महत्वाच्या बातम्या

 पेरमिली ते कुरुमपल्ली रस्त्याचे होणार बांधकाम : भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील शेवटचा टोक म्हणून ओळख असलेल्या पेरमिली परिसरातील कुरुमपल्ली गावासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर झाले असून पेरमिली ते कुरुमपल्ली पर्यंत रस्त्याचे बांधकाम केले जाणार आहे. नुकतेच माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.

राज्यातील न जोडलेल्या वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी व सध्या अस्तित्वात असलेल्या परंतु दुरावस्था झालेल्या रस्त्यांच्या दर्जा वाढीसाठी राज्यात मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ग्राम विकास विभागामार्फत राबविण्यात येते.त्या अंतर्गत पेरमिली ते कुरुमपल्ली रस्त्याचे बांधकाम करण्यासाठी तब्बल ५६६.२२ लक्ष रुपयांची निधी मंजूर करण्यात आले असून या परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे.

पेरमिली परिसरातील बरेच गावे अजूनही मुख्य रस्त्यांनी जोडली नसल्याने पावसाळ्यात या भागातील नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांनी या गंभीर बाबीची दखल घेऊन मोठी निधी खेचून आणली.आता या परिसरातील अनेक गावे मुख्य रस्त्याला जोडली जाणार आहे.त्यामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

नुकतेच या कामाचे माजी जि.प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. सदर भूमिपूजन प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे अहेरी विधानसभा अध्यक्ष लक्ष्मण येरावार, तालुका अध्यक्ष श्रीनिवास विरगोनवार, सत्यनारायण येगोलपवार, बालाजी गावडे, पाटील संजय सडमेक, ताजु कुळमेथे, मासा तलांडी, दसरू आत्राम, अमर गावडे, सुमन मेश्राम, प्रतिमा गावडे, किरण गावडे, नवलेश आत्राम, तारा आत्राम, बंडू दहागावकर, सुरेखा सडमेक, चिला कुमरे, मीरा अतकुलवार आदी उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos