अडपल्ली येथे गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित स्थळाची सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक विकासाला नवी दिशा देणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या अडपल्ली येथील प्रस्तावित स्थळाची महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती ना. शिवेंद्रराजे भोसले यांनी पाहणी केली. यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. मिलिंद नरोटे उपस्थित होते.
अडपल्ली येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित इमारती व परिसराच्या विकासासंदर्भात यावेळी सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रस्तावित प्रकल्पाचा DPR, बांधकामाचे नकाशे तसेच नियोजित विकासकामांची माहिती यावेळी सादर करण्यात आली. विद्यापीठाच्या भव्य व सर्व सुविधायुक्त इमारतीच्या उभारणीसंदर्भात विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.
गोंडवाना विद्यापीठाचा हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्याच्या शैक्षणिक प्रगतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असून, प्रकल्प निर्धारित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यासाठी आवश्यक त्या बाबींवर यावेळी चर्चा झाली. विद्यापीठाच्या पायाभूत सुविधांचा विकास झाल्यास जिल्ह्यातील विद्यार्थी, संशोधक आणि शैक्षणिक क्षेत्राला मोठा लाभ होणार असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या पाहणीदरम्यान भाजपा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अनिलजी पोहनकर, भाजपा जिल्हा महामंत्री प्रकाशजी गेडाम, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकरजी भांडेकर, नगरपरिषद सभापती तथा भाजपा शहराध्यक्ष अनिलजी कुनघाडकर, नगरपरिषद सभापती तथा भाजपा महिला मोर्चा शहराध्यक्ष सीमा कन्नमवार, नगरसेवक हर्षदजी गेडाम, नगरसेविका ज्ञानेश्वरी धंदरे, नगरसेविका अर्चना निंबोड, नगरसेविका शिल्पा हेमके, भाजपा शहर उपाध्यक्ष भारती खोब्रागडे, अविनाशजी विश्रोजवार, भाजयुमो जिल्हा महामंत्री आकाशजी सातपुते, भाजयुमो शहराध्यक्ष साईजी सिलमवार यांच्यासह भाजयुमोचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
गोंडवाना विद्यापीठाच्या प्रस्तावित स्थळाची झालेली ही पाहणी विद्यापीठाच्या पायाभूत विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण टप्पा मानली जात आहे.




Petrol Price




