महत्वाच्या बातम्या

 गरजू महिलांना शक्ती सदन महिला संस्थेमध्ये मोफत प्रवेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा : निराधार, निराश्रीत महिलांना तसेच नैसर्गिक आपत्तीमुळे बेघर झालेल्या महिलांना, कौटुंबिक सामाजिक व आर्थिक आधार नसलेल्या, कौटुंबिक हिंसाचार व कौटुंबिक तणावग्रस्त असलेल्या महिलांना, अन्न, वस्त्र निवारा व प्रशिक्षण याकरिता केंद्रशासन व राज्यशासन पुरस्कृत महिला व बालविकास विभागाअंतर्गत शक्ती सदन महिला संस्था, बेला येथे मोफत प्रवेश दिला जातो.
संस्थेमध्ये प्रवेशाकरिता महिलांचे वय 18 ते 60 वर्ष असावे. त्यांच्यासोबत त्यांची मुले 12 वर्ष वयापर्यंत व मुली 18 वर्ष वयापर्यंत राहू शकतात. प्रवेश घेतल्यानंतर महिलांच्या जनधन खात्यात 500 रूपये महिना, वैद्यकीय मदत, व्यावसायिक प्रशिक्षण, मनोरंजनाची साधने देवून त्यांचे पुनर्वसन केल्या जाते.
प्रवेशाकरिता मधुमती महिला मंडळ लातुर संचलीत शक्ती सदन, नारायण निंबारटे यांची इमारत, बेला, नागपूर रोड येथे किंवा 8788677810, 9595363137, 9172588677, 7756903774 या क्रमांकावर संपर्क साधावा.

  Print


News - Bhandara
Related Photos