महत्वाच्या बातम्या

 हेक्झावेअरच्या प्राथमिक चाचणीत ३५ जणांची निवड


- रोजगार व प्रशिक्षण विभागाचा प्लेसमेंट ड्राईव्ह 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या रोजगार व प्रशिक्षण विभागाच्या वतीने घेण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये हेक्झावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीने प्राथमिक चाचणीत ३५ विद्यार्थ्यांची निवड केली आहे. मुलाखतीनंतर अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. विद्यापीठाच्या महाराज बाग स्थित दीक्षांत सभागृह येथे हेक्झावेअर टेक्नॉलॉजीस कंपनीचा प्लेसमेंट ड्राईव्ह बुधवार २४ एप्रिल २०२४ रोजी पार पडला.

हेक्झावेअर टेक्नॉलॉजीस ही कंपनी जागतिक तंत्रज्ञान आणि वाणिज्य प्रक्रिया क्षेत्रात सेवा देणारी कंपनी आहे. १९ विविध देशांमध्ये या कंपनीचे कार्यालय आहेत. या कंपनीकडून कस्टमर सपोर्ट एक्झिक्यूटिव्ह आणि इंटरनॅशनल प्रोसेस या पदाकरिता या मुलाखतीचे आयोजन केले होते. कंपनीकडून आयोजित करण्यात आलेल्या प्लेसमेंट ड्राईव्ह मध्ये एकूण १७६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली तर प्रत्यक्ष ७० विद्यार्थी मुलाखत प्रक्रियेला उपस्थित होते. 

दीक्षांत सभागृह येथे आयोजित रोजगार मेळाव्या प्रसंगी विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली प्र-कुलगुरु डॉ. संजय दुधे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. 

यावेळी विद्यापीठाचे रोजगार व प्रशिक्षण अधिकारी डॉ. भूषण महाजन यांची उपस्थिती होती. कंपनीच्या वतीने सुरुची डंभारे, तयबा खान, पूजा पवार यांच्याकडून प्राथमिक चाचणी निवड प्रक्रिया राबविण्यात आली. प्राथमिक निवड चाचणीत उत्तीर्ण झालेल्या ३५ विद्यार्थ्यांमधून मुलाखतीनंतर अंतिम विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. 





  Print






News - Nagpur




Related Photos