महत्वाच्या बातम्या

 आश्रमशाळेतील आठ विद्यार्थ्यांचे घवघवीत यश : जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या शासकीय आश्रम शाळेतील आठ विद्यार्थी संयुक्त प्रवेश परीक्षेच्या (जेईई) ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले असून आश्रमशाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल कौतुक होत आहे. आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यातील दुर्गम अतिदुर्गम भागातील या आठ गरीब विद्यार्थ्यांचे अभियंता बनण्याचे स्वप्न साकार होऊन त्यांच्या घरातील अंधार दूर होणार आहे. आता आयआयटी मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी हे विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.

या विद्यार्थ्यांनी मिळवलेले यश आदिवासी विकास विभागाच्या आश्रम शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय प्रेरणादायक असून प्रशासनासाठी सुद्धा भूषणावह आहे.

आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांनी अथक परिश्रम घेऊन शासकीय व अनुदानित आश्रम शाळेतील विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी मिशन शिखर हा उपक्रम राबविला. या अंतर्गत गडचिरोली प्रकल्पातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कुरंडीमाल येथे जेईई व नीट परीक्षेच्या तयारीसाठी विशेष शिकवणी वर्गाचे आयोजन सप्टेंबर २०२३ ते जानेवारी २०२४ या कालावधीत करण्यात आले होते. या प्रकल्पातील ७ आश्रम शाळेतील एकूण ३२ विद्यार्थ्यांनी जेईई परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल नुकताच लागला असून त्यातील ८ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झालेले आहेत. 

शासकीय माध्यमिक आश्रम शाळा कोरची येथील प्रेरणा राऊत (७२.७८%), स्नेहल कुमरे (६४.७१%), राज कुमरे(५१.४६%), सानिया किरंगे (४४.०५%), शासकीय आश्रम शाळा रेगडी येथील मनोज हिचामी (४२.९९% ), शितल कुमरे (४१.४८% ), शासकीय आश्रम शाळा पेंढरी येथील सुस्मिता नरोटे (५५.०९%) तर शासकीय आश्रम शाळा येंगलखेडा येथील हर्षेल सोनवानी (५९.२३%) असे आठ विद्यार्थी जेईई ॲडव्हान्स परीक्षेसाठी पात्र झाले आहेत.

गडचिरोली प्रकल्पाचे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुल कुमार मीना, तात्कालीन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल्ल पोरेड्डीवार, डॉ. प्रभू सादमवार, अनिल सोमनकर, सुधाकर गौरकर, मुख्याध्यापक संजय शेंडे, उच्च माध्यमिक शिक्षिका मनीषा सुरटकर, सुधीर भाकरे, अभिमन्यू वाटगुरे, नितीन साठवने, अशोक परतेकी, अनिल पवार, भुवनेश्वर दाऊदसरे, प्रकाश वट्टी, बी.एम. चुधरी, एस.एस. खेत्री, व्ही.आर. राऊत, ए.पी. कांबळी तसेच कंत्राटी शिक्षक ऋतुजा खोब्रागडे, निरुपमा मंडल, काजल दास, कोमल सोनवने आदींनी या विद्यार्थ्यांच्या यशासाठी परिश्रम घेतले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos