नक्षल्यांनी दहा जेसीबीसह पाच ट्रॅक्टर जाळले, तीन कोटींचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
एटापल्ली तालुक्यात रस्त्याच्या कामावरील दहा जेसीबी आणि पाच ट्रॅक्टर नक्षल्यांनी पेटवून दिली आहेत. या वाहनांची किंमत तब्बल तीन कोटी रूपये आहे. सदर घटना आज १ डिसेंबर रोजी सकाळी उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे रस्ता कामावरील मजूरांना नक्षल्यांनी रात्रभर अडवून ठेवले होते.
आज १ डिसेंबरपासून नक्षल्यांचा सप्ताह सुरू झाला आहे.पोलिसांनी सतर्कतेचा इशारा दिला आहे. तालुक्यात वट्टेपल्ली ते गट्टेपल्ली रस्त्याचे काम सुरू आहे. या कामावर असलेली वाहने नक्षल्यांनी पेटवून दिली. वाहनाच्या डिझेल टाकीतून डिझेल काढून वाहने पेटवून देण्यात आली आहे. घटनास्थळी पोलिस पथके रवाना झाली आहेत. या परिसरात नक्षलविरोधी अभियान तिव्र करण्यात आले आहे. सतर्कतेचा इशारा असतानाही कंत्राटदाराने काम सुरूच ठेवले होते. यामुळे कंत्राटदाराने निष्काळजीपणा का केला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. नक्षल सप्ताहाच्या सुरूवातीलाच नक्षल्यांनी वाहनांची जाळपोळ केली आहे. 

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-01


Related Photos