महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांची संत गाडगेबाबा जयंती कार्यक्रमाला उपस्थिती 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : आल्लापली येथील श्री. संत गाडगेबाबा जयंती मोठ्या उत्सहात पार पडले. माजी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी जयंती कार्यक्रमाला उपस्थित राहून संत गाडगेबाबा यांना अभिवादन केले. माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष यांनी पुढे बोलतांना. संत गाडगे महाराजांचं खरं नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर हे होते. त्यांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ रोजी अमरावतीतल्या शेंडगाव इथं झाला. लहानपणी पासूनच जनजागृती करण्याचं गाडगे महाराजांनी ठरवलं होते आणि त्यासाठी ते गावोगावी भटकत असत. डोक्यावर झिंज्या, त्यावर खापराच्या तुकड्याची टोपी, एका कानात कवडी, तर दुसऱ्या कानात फुटक्या बांगडीची काच, एका हातात झाडू, दुसऱ्या हातात मडके असा वेश.

तर गावोगावी जाऊन लोकांची गटारं साफ करुन त्यांना स्वच्छतेचं महत्व शिकवून, त्यांच्याकडून मिळालेल्या पैशातनं त्या गावात शाळा किंवा हॉस्पिटलं बांधणारे संत गाडगे महाराज स्वातंत्र्यापूर्वीपासूनच जनजागृतीचे काम करत असत. विसाव्या शतकातल्या समाज सुधारणेसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये गाडगेबाबा यांचं कार्य महत्वाचं ठरते . गाडगेबाबांनी अनेक गावं पालथी घातली. ज्या गावात जाऊन ते आधी साफ सफाई करायचे त्याच गावात गाडगेबाबा प्रवचन करत असत. आपल्या प्रवचनातनं गाडगेबाबांनी तीर्थी धोंडापाणी देव रोकडा सज्जनी असे सांगितलं. दीन, दुबळे, अनाथ, अपंगांची सेवा करणाऱ्या गाडगेबाबांनी देवळात जाऊ नका, मूर्तिपूजा करू नका, सावकाराचे कर्ज काढू नका, अडाणी राहू नका, पोथी-पुराणे, मंत्र-तंत्र, देवदेवस्की, चमत्कार असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं आपल्या प्रवचनात लोकांच्या मनावर बिबवले.

चोरी करू नका, व्यसनांच्या आहारी जाऊ नका, देवा-धर्माच्या नावाखाली प्राण्यांची हत्या करू नका, जातिभेद व अस्पृश्यता पाळू नका असं त्यांना आपल्या प्रवचनातनं सांगितलं. आपल्या आवडीसाठी प्राणी मारता मात्र त्याला देवाचं नाव देऊ नका असा स्पष्ट विचार गाडगेबाबांनी मांडला. देव दगडात नसून तो माणसांत आहे हे त्यांनी सर्वसामान्यांच्या मनावर ठसविण्याचा प्रयत्न केला.

महाराष्ट्र शासनानेही स्वच्छ गावांसाठी पुढाकार घेत संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान ही योजना राबवली होती असे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी मोलाचे संत गाडगेबाबांचे विचार उपस्थितांना व्यक्त करुन सांगितले या संत गाडगेबाबा महाराजांचे विचार व्यक्त करताना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या डोळ्यात अश्रू दिसुन येत होते.

यावेळी उपस्थित शंकर मेश्राम सरपंच आलापल्ली, सुरेश गड्डमवार त.मु. अध्यक्ष आलापल्ली, सौ. सुमन खोब्रागडे ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, शारदा कळते ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, सौ. सुगंदा मडावी ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, सौ. शकुंतला दुर्गम ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, सौ.भाग्यश्री बेझलवार ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, रजनी गंजीवावार ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, सौ.उषा आत्राम ग्राम पंचायत सदस्य आलापल्ली, गुप्ता मॅडमसह आविसंचे कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos