महत्वाच्या बातम्या

 रोजगारश्रम कौशल प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन : माविमच्या पुढाकाराने महिलांना संधी


-  जिल्हयातील पहिले केंद्र एकलारीला

- कौशल्य विकास विभाग व मावीमचा पुढाकार

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला आर्थिक विकास महामंडळ, भंडाराच्या वतीने आज १५ मार्च २०२३ रोजी किरण गारमेंट्स मॅन्युफॅक्चरींग ॲड ट्रेनिंग सेंटर, एकलारी येथे महाराष्ट्र राज्य कौशल विकास सोसायटी अंतर्गत प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानांतर्गत मोफत रोजगारश्रम कौशल प्रशिक्षण केंद्रांचे जि.प. सदस्य एकनाथ फेंडर यांच्या हस्ते फित कापून उद्घाटन करण्यात आले.

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य व उद्योजकता विकास विभागाचे सहायक आयुक्त सुधाकर झळके, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ दांदळे, रत्नाताई फेंडर, अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी सुहास बोंदरे उपस्थित होते.

जि.प. सदस्य एकनाथ फेंडर यांनी प्रशिक्षणार्थी महिलांनी या प्रशिक्षणाचे लाभ घेऊन लघुउद्योजक व्हावे, असे मत व्यक्त केले. या उद्घाटन कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे जिल्हा समन्वय अधिकारी प्रदिप काठोळे यांनी केले. याप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी शैलजा वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी शशिकुमार बोरकर, सहायक आयुक्त सुधाकर झळके, अन्नासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, भंडाराचे जिल्हा समन्वय अधिकारी सुहास बोंदरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमादरम्यान प्रशिक्षणार्थी महिलांना प्रशिक्षण किट्स वाटप करण्यात आले.

सुत्रसंचालन किरण लोकसंचालित साधन केंद्राचे व्यवस्थापक गौतम शहारे यांनी केले. यावेळी किरण लोकसंचालित साधन केंद्राच्या अध्यक्षा भैरवी सार्वे, नुतन सार्वे यांच्यासह प्रशिक्षणार्थी महिला व बचत गटातील महिला उपस्थित होते.





  Print






News - Bhandara




Related Photos