भामरागड तालुक्यातील मेडपल्ली येथील इसम पुरात वाहून गेला


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / भामरागड :
पामुलगौतम नदीवरील पुलाजवळ शौचास गेलेला इसम पुरात वाहून गेल्याची घटना काल ७ ऑगस्ट  रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली आहे. मात्र त्याचा अद्याप पत्ता लागलेला नसून शोध सुरू आहे.
संजय कवडूजी कोडापे (३६)  रा. मेडपल्ली ता. भामरागड असे मृतकाचे नाव आहे. संजय कोडापे हा मुळ एटापल्ली तालुक्यातील वट्टेगटा येथील रहिवासी होता. मागील ८  ते ९ वर्षांपासून तो सासूरवाडी मेडपल्ली येथे पत्नी व दोन मुलांसह राहत होता. काल ७ ऑगस्ट  रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास तो पामुलगौतम नदीकडे शौचास गेला. यावेळी त्याचा पाय घसरल्याने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पत्नीच्या तक्रारीवरून भामरागड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अद्याप त्याचा कुठेही थांगपत्ता लागलेला नाही.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-08-08


Related Photos