महत्वाच्या बातम्या

 राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार : सरकारने काढला आदेश


विदर्भ न्यूज एक्सप्रेस

वृत्तसंस्था / मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते. मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने मोठा निर्णय घेतला आहे.

यापुढे आता भटक्या मांजरींच्या नसबंदी आणि लसीकरण करण्याचा निर्णय सरकराने घेतला असून, याबाबत नगरविकास विभागाने शासन परिपत्रक देखील काढले आहे. ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःहून किंवा AWBI द्वारे मान्यताप्राप्त प्राणी कल्याण संस्थेद्वारे ABC कार्यक्रमासाठी भटक्या मांजरींचे जन्म नियंत्रण आणि लसीकरण योजना राबवण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत.

भटक्या मांजरांचा उपद्रव कमी करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे इत्यादींबाबत सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. तर भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्याकरिता भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबविण्यात येतो. त्याच धर्तीवर भटक्या मांजरांसाठी नसबंदी व शस्त्रक्रिया कार्यक्रम राबविण्याकरिता सरकार विचार करत होते. मात्र अखेर याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील भटक्या मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव कमी करण्यासाठी सरकराने निर्बीजीकरण, लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे.

  Print


News - Rajy
Related Photos