महत्वाच्या बातम्या

 जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांच्या हस्ते टिकेपल्ली येथील शिवमंदिरासमोर सभामंडपाचे लोकांर्पण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुलचेरा : तालुक्यातील लगाम जवळील टिकेपल्ली येथे पुरातन शिव मंदिर असून दरवर्षी महाशिवरात्रीला जत्रा भरत असून मोठ्या संख्यानी भाविक दर्शनासाठी येत असतात. मात्र मंदिरा समोर सभामंडप नसल्याने भाविकांना गैरसोय होत होती. मात्र गेल्यावर्षी माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी शब्द दिले होते. सदर मंदिरापर्यंत डांबरीकरण रस्ता व मंदिरासमोर सभा मंडप उपलब्ध करून देतो म्हणून आणि ते पूर्ण झाले असून देवस्थान समितीकडुन आभार व्यक्त केले. तसेच शिवरात्रीच्या औचित्य साधून आज शिवमंदिरात भगवान शिवचे दर्शन घेवून सभामंडपाच्या लोकांर्पण करण्यात आले.

यावेळी कार्यक्रमाला कु. साधनाताई मडावी सरपंच , कु. सुनीता कुसनाके जिल्हा परिषद सदस्य, शैलेंद्र पटवर्धन नगर परिषद उपाध्यक्ष अहेरी, प्रशांत गोडसेलवर नगर परिषद सदस्य अहेरी, सुरेश गंगाधरीवार सदस्य राजपूरप्याच, श्रीकांत समदार सरपंच शांतिग्राम, लिंगा टेकुलवार, कमल बाला आ.वि.स कार्यकर्ता, शंकर पानेमवार, राजु दुर्गे ग्राम पंचायत सदस्य महागाव, प्रमोद ,शिवमंदिर टिकेपल्ली अध्यक्ष अजय नैताम, शिवमंदिर सचिव तुळशीराम मडावी, उपाध्यक्ष भीमराव कोरेत, कोशाध्यक्ष मारोती नैताम, सुरेखा नैताम उपसरपंच, गिरमाजी मडावी, बालीताई कोरेत सदस्य, व्यंकटेश काका तंटा मुक्त अध्यक्ष, बाबुराव सडमेक, ईश्वर सडमेक, विलास टेकुलवार, दिपाणकर समदार, दिनेश मडावी, सत्यवान कोरेत, बिचू तलांडे, नरेंद्र गर्गम, राकेश सडमेक, प्रमोद गोडशेलवार, प्रकाश दुर्गेसह गावांतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos