महत्वाच्या बातम्या

 जूनोना तलाव परिसरात स्वच्छता अभियान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : संडे म्हणजे रिलॅक्स डे. सकाळी उशिरा उठायचे आरामशीर चहाचा आस्वाद घ्यायचा. नंतर आठवड्या भरापासून साठवलेल्या कामाची यादी हातात घ्यायची किंवा निसर्गरम्य स्थळावर वन डे पिकनिक करिता निघायचे.

सहसा हीच दिनचर्या बहुतांश घरी असते. पिकनिक साठी शहराजवळपासच्या निसर्गरम्य तलावाकाठी, जंगलात एन्जॉयमेंट रिलॅक्सेशन साठी जाणे. पण कळत नकळत पार्टी झाल्यावर निघताना परिसरात प्लास्टिकच्या बाटल्या, थर्माकोल प्लेट, दारूच्या रिकाम्या बाटल्या, ग्लास, चिप्स पॅकेट उरलेले अन्न तिथेच फेकून परततात. यातला बहुतांश कचरा नकुजणारा जंगलातले, तलावा भोवतालीच इकोसिस्टम बिघडवणारा असतो.

पण याला अपवाद काही निसर्गप्रेमी, समाजसुधारक. आपले निसर्गाला काही देणे ही जाण त्यांना आहे.

रविवारच्या सुट्टीचा सदुपयोग म्हणून जंगल मार्गे बल्लारपूर चंद्रपूर रस्त्यावरील ऐतिहासिक  जुनोना तलावाच्या काठी विखुरलेला न कुजणारा कचरा संकलन प्रकल्प राबवला.

या वाकन क्लीन ड्राईव्हचा प्रांजळ हेतू हाच की मनुष्याद्वारे निसर्गाचे नुकसान भरून काढणे.

आज 5 मार्च रविवारला सकाळी सात वाजेपासून ते दहा वाजेपर्यंत जूनोना तलाव परिसर स्वच्छता अभियान राबवण्यात आला.

या अभियानात बर्डस ऑफ चंद्रपूरच्या मार्गदर्शनात आयरन मॅन ग्रुप चंद्रपूर, पर्यावरण वाहिनी बल्लारपूर, चांदा रनर्स अँड रायडर्स ग्रुप, रोटरी क्लब बल्लारपूर, चंद्रपूर डॉक्टर्स असोसिएशन चंद्रपूर या संघटनेच्या 40 पेक्षा जास्त सदस्यांनी श्रमदान दिले.

पर्यावरण वाहिनीचे मोहम्मद शरीफ, संजय पंदिलवार, प्रशांत भोरे, आदित्य ज्ञान प्रकाश, ऍड. किशोर पुसलवार, राजेश मारपल्लीवार, कुर्बान खान तसेच बर्ड्स ऑफ चंद्रपूरचे आणि डॉक्टर्स असोसिएशनचे डॉ कल्पना गुलवाडे, डॉ.  मंगेश गुलवाडे, डॉ. अनुप पालीवाल, डॉ. इर्शाद शिवाजी, डॉ. रिझवान शिवाजी, डॉ. प्राजक्ता अस्वार, डॉ. प्रिती चव्हाण, डॉ. मनिषा वासाडे, डॉ. अभय बोरकर, डॉ. मधुकर गुलवाडे, डॉ. हर्षल मटाले, डॉ. कमलेश ठाकूर, डॉ. पल्लवी इंगळे , ASI श्रीपाद बल्की, जय बाल्की (१० वर्ष), वीर बाल्की (५ वर्ष) आणि रोटरी बल्लारपूरचे प्रफुल चरपे, निखिल गुजर, महेश कायरकर, कल्पेश पटेल, प्रशांत भोरे आणि जुनोना ग्रामपंचायतचे सरपंच विवेक शेंडे, उपसरपंच किशोर कोडापे, प्रशांत मांढरे उपस्थित होते.

वन विभाग चे आर एफ ओ कारेकर, आर ओ पाथर्डे, संदीप परवे यांचे सहकार्य लाभले.

वन विभाग च्या कर्मचाऱ्यांनी स्वच्छता मोहिमेत साठवलेला कचरा डम्पिंग यार्ड येथे स्थलांतरित केला.

उपस्थित निसर्गप्रेमींनी शहरवासीयांना आव्हान केला की पिकनिक साठी निसर्गरम्य ठिकाणी येताना एक वेस्ट बीन बॅग सोबत आणावी व परत जाताना आपल्यामुळे झालेला कचरा सोबत न्यावा आणि योग्य ती विल्हेवाट लावावी असे आव्हान करण्यात आले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos