महत्वाच्या बातम्या

 माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते कमलापूर जत्रेचा शुभारंभ


- सम्मक्का-सारक्का जत्रेत भाविकांची मांदियाळी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / अहेरी : तालुक्यातील कमलापूर येथे प्रत्येक सण मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा केला जातो. याठिकाणी मागील काही वर्षांपासून समक्का-सारक्का जत्रा देखील सुरू करण्यात आल्याने येथे भाविकांची मांदियाळी बघायला मिळत आहे. २१ फेब्रुवारी रोजी माता समक्का- सारक्का देवींच्या पूजनाने माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांच्या हस्ते जत्रेचे शुभारंभ करण्यात आले.

कमलापूर येथील समक्का- सारक्का जत्रेसाठी मागील काही दिवसांपासून जय्यत तयारी करण्यात आली होती. मागील काही वर्षांपूर्वी तलावाच्या पायथ्याशी सुरू केलेल्या पूजन कार्यक्रमाला आता जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून या ठिकाणी परिसरातीलच नाही तर लगतच्या राज्यातील भाविक दर्शनासाठी येत असतात. याठिकाणी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये आणि कमिटीला आर्थिक अडचण भासू नये, यासाठी माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशराव आत्राम यांनी मोठी आर्थिक मदत देखील केली.

२१ ते २४ फेब्रुवारी पर्यंत पूजापाठ, महाप्रसाद वितरण, आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जवळपास तीन ते चार दिवस चालणाऱ्या महोत्सवाची सुरुवात माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रिशशराव आत्राम यांच्याहस्ते पूजाअर्चाने करण्यात आली. त्यांनी बळीराजाला सुखी ठेवण्यासाठी मातेकडे साकडे घातले.

यावेळी युवानेते कुमार अवधेशरावबाबा आत्राम संतोष मद्दीवार भाजपा तालुका अध्यक्ष, संदिप रेपलवार, संदिप ओलेटीवार, श्रीधर दुग्गीराला, अरविंद परकीवार, रवि पंजलवार, बाबुराव चापले, श्रीनिवास मंचकवार, भगवंत येमुलवार, जीवन पोतेरी, सरपंच सचिन ओलेटीवार, उपसरपंच सुदीप रंगुवार, जीवन पोरेटी, श्रीनिवास मंचलवार, छाया आईलवार यांच्यासह असंख्य गावकरी उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos