सोडे आश्रमशाळेत महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा
- प्रकल्पातील आठ शाळांचा समावेश : १४४ विद्यार्थी झाले प्रविष्ट
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत सोडे येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या आश्रम शाळा केंद्रावर मंगळवार, २३ एप्रिल रोजी सकाळी ११ ते दुपारी २ या कालावधीत महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा पार पडली. सदर परीक्षेत इयत्ता ८ ते १० चे १४४ विद्यार्थी प्रविष्ट झाले.
सोडे परीक्षा केंद्रावर सोडे, कारवाफा, पेंढरी, मुरुमगाव, सावरगाव, रांगी येथील शासकीय आश्रम शाळेतील तसेच जपतलाई, गिरोला या अनुदानित आश्रम शाळेतील इयत्ता ८, ९, १० च्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. १४४ परीक्षार्थींमध्ये ३३ मुले व १११ मुलींचा सहभाग होता. २०० प्रश्नांच्या प्रश्नपत्रिकेत मानसिक क्षमता कसोटीवर १०० प्रश्न, नैसर्गिक शास्त्रेवर ४० प्रश्न, सामाजिक शास्त्रेवर ४० प्रश्न व गणित विषयावरील २० प्रश्नांचा समावेश होता.
परीक्षा नियंत्रक म्हणून निकेश तिम्मा होते. केंद्र संचालक म्हणून सोडे आश्रम शाळेचे माध्यमिक मुख्याध्यापक एस.आर. मंडलवार होते. उप केंद्रसंचालक म्हणून माध्यमिक शिक्षक पी.यू. बखर यांनी काम पाहिले. उच्च माध्यमिक शिक्षक ए.व्ही. भुजाडे, योगिता बिसेन, निशा ईश्वरकर, माध्यमिक शिक्षक के.एन. नागमोती, पदवीधर प्राथमिक शिक्षक एन.एस. पानगंटीवार, व्यवसायिक प्रशिक्षिका विजया देवतळे यांनी पर्यवेक्षकाचे काम पाहिले.
परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी अधीक्षक आर.डी. लांडगे, माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, भैय्याजी सोमनकर व शिक्षकांनी सहकार्य केले.
News - Gadchiroli