महत्वाच्या बातम्या

 पिण्याच्या पाण्याची समस्या तातडीने सोडवा : अन्यथा भाजपा नगरसेवकांचा तीव्र आंदोलनाचा इशारा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / अहेरी : अहेरी शहरात महाराष्ट्र जिवन प्राधिकरण (MJP) तर्फे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो, परंतु मागील काही महिन्यांपासून ह्या योजनेत अनेक समस्या निर्माण झाले असून ह्यामुळे शहरातील नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावे लागत आहे, वारंवार पाणी पुरवठा बंद होणे, फिल्टर मशीन असतांनाही गढूळ पाण्याचा पुरवठा करणे, बिल्चिंग पावडर व तुरटीचे योग्य प्रमाणात मिश्रण न करणे, शहरात अनेक ठिकाणी लिकेज व्हॉल्व व पाईप लाईनची दुरुस्ती न करणे, दररोज ठरलेल्या वेळी पाणी न सोडने अश्या अनेक प्रकारच्या तक्रारी जनतेकडून भाजपा नगरसेवकांना दररोज प्राप्त होत होते.

जनतेकडून प्राप्त तक्रारीचे त्वरित दखल घेत अहेरी नगर पंचायतचे पाणी पुरवठा सभापती दिपाली मुकेश नामेवार यांच्या नेतृत्वाखाली काल भाजपाचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि शहरातील नागरिकांसह जीवन प्राधिकरण अहेरी कार्यालयाला धडक देऊन ह्यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले, अभियंता गोर्लावार आणि कोतपल्लीवार ह्यांना एक निवेदन देत जनतेच्या सर्व समस्या त्यांना लक्षात आणून दिल्या. तसेच ह्या समस्या तातडीने सोडवा अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांना दिला ह्यावर सकारात्मक प्रतिसाद देत ह्या सर्व समस्या येत्या ८ दिवसात निकाली काढू असे आश्वासन त्यांनी ह्यावेळी दिले.

ह्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री, पाणी पुरवठा सभापती दिपाली नामेवार, नगरसेवक शालीनी पोहणेकर, लक्ष्मी मद्दीवार, सुनिता मंथनवार, नगरसेवक अमोल गुडेल्लीवार, विकास उईके, संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, श्रीकांत नामेवार, पवन दोंतुलवार, साईनाथ डेरकर, अशोक बोंमनवार, नवले काका सह अनेकांची उपस्थिती होती.





  Print






News - Gadchiroli




Related Photos