महत्वाच्या बातम्या

 कोण त्रास देतोय, फक्त एक फोन करा : केंद्र सरकारच्या महिला सुरक्षेसाठी योजना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : केंद्र सरकारने महिला सुरक्षेसाठी आणि त्यांना सक्षम करण्यासाठी महत्त्वाकांक्षी योजना २०२५-२६ पर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. महिला सुरक्षेसाठी नेमक्या कोणत्या योजना सुरू आहेत. 

केंद्र सरकार महिलांना देतेय शक्ती

- १ हजार १७९.७२ कोटी रुपये महिला सुरक्षा योजनांसाठी मंजूर
- ८८५.४९ कोटी रुपये गृह मंत्रालय त्यांच्या बजेटमधून देणार
- २९४.२३ कोटी रुपये निर्भया निधीतून देण्यात येत आहेत.

योजना कधी सुरू झाली?

२०२१-२२ पासून ही योजना चालविली जात आहे. महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण या उद्देशाने सर्वंकष योजना म्हणून केंद्र सरकारने ही योजना सुरू केली. याला शक्ती अभियान असेही म्हटले जाते.

योजना कोणत्या?

- ११२ इमर्जन्सी रिस्पॉन्स सपोर्ट
- नॅशनल फॉरेन्सिक डेटा सेंटरच्या स्थापनेसह प्रयोगशाळांचे अपग्रेडेशन
- लॅबोरेटरीजमध्ये डीएनए विश्लेषण, सायबर फॉरेन्सिक क्षमता मजबूत करणे
- सायबर गुन्ह्यांना प्रतिबंध
- अत्याचाराचा सामना करण्यासाठी तपासनीस आणि अभियोक्ता यांची क्षमता-निर्मिती आणि प्रशिक्षण
- महिला हेल्प डेस्क आणि मानव तस्करी विरोधी युनिट्स
- पोलिसांना करा बिनधास्त फोन
- पोलिस ठाण्यांमध्ये महिला हेल्प डेस्क
- पोलिसांना दरवर्षी महिला, बालकांवरील गुन्हे रोखण्यासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे.
- पोलिस ठाण्यांमध्येही महिला हेल्प डेस्क उभारण्यात येणार आहेत.
- मानवी तस्करी विरोधी युनिटची स्थापना करण्यात आली.

उद्देश काय?

- महिलांची सुरक्षितता, संरक्षण आणि सक्षमीकरण करणे
- महिलांवर सतत परिणाम करणाऱ्या समस्या सोडविणे
- हक्क मिळवून देणे
- राष्ट्र उभारणीत समान भागीदार देणे
- महिलांच्या नेतृत्वाखाली विकास साधण्याची कटिबद्धता
- आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे
- मुक्तपणे निर्णय घेण्याची संधी देणे
- कौशल्य विकास, क्षमता निर्मिती, आर्थिक साक्षरता, सूक्ष्म-कर्ज मिळण्यातील अडचणी दूर करणे





  Print






News - World




Related Photos