अपघात विम्यात सातबाराची जाचक अट


- शेतकरी कुटुंबातील सर्वांना लाभ द्यावा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / मुल
: शेतात कामे करतांना होणार अपघात,वीज पडणे,पूर, सर्पदंश, विचु दंश, विजेचा शाॅक बसणे यासह रस्तावरील अपघात,वाहन अपघात व अन्य कारणांमुळे शेतकऱ्यांचा मृत्यू  होतो. काहींना अपंगत्व येते. यासाठी शासन विम्याव्दारे लाभ देतात. मात्र,त्यात शेतकरी सातबाराधारक असावा, ही अट आहे. या  शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यदेखील शेतातील मिळणाऱ्या  उत्पनावरच अवलंबून असताना त्यांना या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे  शेतकरी कुटुंबाना लाभ द्यावा,अशी मागणी आता शेतक-यांकडून केली जात आहे.   गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेव्दारे या अपघातासाठी दोन  लाखांपर्यंत विम्याचे कवच शेतक-यांना आहे. यामध्ये शेतक-यांनी  स्वत किंवा त्यांच्यावतीने अन्य कोणत्याही संस्थेने स्वतंत्ररीत्या विमा  हप्ता भरण्याची गरज नाही. शासनाकडून सर्व खातेदार शेतक-यांचा विमा हत्ता भरण्यात येतो. यापूर्वी शेतक-यांनी अथवा त्यांच्यावतीने अन्य संस्थेने कोणतीही वेगळी विमा योजना लागू केल्यास किंवा विमा    उतरविल्यास त्याचा या योजनेशी काहीही संबंध नसतो.  या विमा योजनेअंतर्गत मिळणारे लाभ स्वतंत्र असतात. योजनेचा लाभ मिळण्यासाठी विहित प्रपत्रे,कागदपत्रे वगळता अन्य कागदपत्रे शेतक-यांनी नव्याने सादर करण्याची आवश्यकता नाही. मात्र,शेतकरी कुटुंबातील सदस्यांना या योजनेचा मिळत नाही ही अट जाचक असल्याने या योजनेच्या निकषात बदल करण्याची मागणी केली जात आहे.
 गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजनेतर्गत अपघाती मुत्यू झाल्यास  अपघातामूळे दोन डोळे अथवा दोन अवयव निकामी झाल्यास अपघातामुळे एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास एक लाखाची भरपाई  दिल्या जाणार आहे. परंतु  शेतक-यांची पत्नी,मृत शेतक-याची अविवाहीत मुलगी, आई, मूले, मृत शेतक-याचे नातंवाडे मृत शेतक-याची अविवाहीत मुलगी वारसदार राहणार आहेत.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-08-20


Related Photos