महत्वाच्या बातम्या

 जंगली डुकराच्या हल्ल्यात महिला जखमी : सावली तालुक्यातील घटना


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सावली : सावली तालुक्यातील महिला रविवार दुपारी १२:०० वाजता शेतात कापूस काढत असतांना ललिता सुखदेव कन्नमवार (45) यांच्यावर रानटी रानडुकराने हल्ला केला.
सदर माहिती नुसार कोंडेखल येथील महिला असून कपिल झिंगुजी ठाकूर यांच्या शेतात कापूस काढत असतांना कापसात लपून बसलेल्या रानटी रानडुकराने तिच्यावर हल्ला करून डाव्या हाताला, छातीवर, कानाला, मांडीवर जबर जखमी केल्याने प्रथम ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतु हाताला व कानाला गंभीररीत्या मोठी जखम झाल्याने सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले.
याची माहिती वनविभागाला दिली असता वन विभागाचे कर्मचारी, वनरक्षक, मुंडे राउंड ऑफिसर सूर्यवंशी, वन समिती अध्यक्ष कुमदेव सहारे, उपसरपंच नरेश बाबनवाडे, राकेश कंकडालवार, गणेश कन्नमवार, विजय जिगरवार व वन कर्मचारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केले.
महीलेला लवकरात लवकर वनविभागाकडून आर्थिक मदत देण्याची मागणी गावातील नागरिकाकडून करण्यात येत आहे. तालुक्यात वाघ, बिबट, रानडुक्कर यांच्या हल्ल्यामुळे शेतकरी, शेतमजूर, भयभीत झालेले आहे. त्वरित बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.





  Print






News - Chandrapur




Related Photos