महत्वाच्या बातम्या

 अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल : आधी लेखी परीक्षा, नंतर शारीरिक चाचणी होणार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली : भारतीय सैन्याने अग्निपथ याेजनाेंतर्गत अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल केले आहे. आता सर्वप्रथम लेखी परीक्षा उत्तीर्ण करावी लागणार आहे. त्यानंतरच शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जाईल.

आतापर्यंतच्या प्रक्रियेत सर्वप्रथम शारीरिक आणि वैद्यकीय चाचणी घेतली जात हाेती. त्यात यशस्वी ठरलेल्या उमेदवारांचीच लेखी परीक्षा घेण्यात यायची. आता ही प्रक्रिया बदलणार आहे. लवकरच नव्या प्रक्रियेनुसार अग्निवीर बनण्यासाठी नाेंदणी सुरू करण्यात येणार आहे. गेल्या वर्षी लष्करात अग्निवीरांची भरती सुरू करण्यात आली हाेती.

४० हजार ००० अग्निवीरांची भरती झाली गेल्या वर्षी

नाैदलानेही प्रक्रिया बदलली : नाैदलनेही अग्निवीरांच्या भरती प्रक्रियेत बदल केला आहे. आधी ऑनलाइन प्रवेश परीक्षा हाेईल. त्यानंतर निवडलेल्या उमेदवारांना मेरिट आधारे प्रक्रियेसाठी बाेलाविण्यात येईल.

परीक्षा हाेणार ऑनलाइन -

अग्निवीरांची लेखी परीक्षा ऑनलाइन हाेईल. त्यासाठी विविध ठिकाणी असलेल्या नामांकित केंद्रावर उमेदवारांना जाता येईल. परिणामी एकाच ठिकाणी माेठी गर्दी हाेणार नाही. ही परीक्षा ६० मिनिटांची राहणार आहे. त्यानंतर मेरिटनुसार पुढील प्रक्रियेसाठी बाेलाविण्यात येईल.





  Print






News - Rajy




Related Photos