महत्वाच्या बातम्या

 प्रंचित सावकार पोरेड्डीवार यांच्या जन्म दिवसानिमित्त रवी येथील तरुणांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वाटप


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी/ गडचिरोली : 
वाचन माणसाला विचाराने व कृतीने श्रीमंत बनवते. आपणास उत्तम शरीरासाठी उत्तम व्यायाम व जेवणाची आवश्यकता असते. त्याच प्रमाणे उत्तम बुद्धिमत्तेसाठी रोज वाचन करणे गरजेचे असते. वाचनाने कल्पनाशक्तीचा विकास होतो. वाचनाने आपल्या जीवनात निश्चित परविर्तन घडु शकते, म्हणुन विद्यार्थ्यांनी नियमित वाचन करावे असे ज्यांचे विचार आहेत असे युवकांचे मार्गदर्शक जिल्हा म. सह. बँक गडचिरोलीचे विद्यमान अध्यक्ष प्रंचीत सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या जन्म दिवसाचे औचित्य साधून युवामंच सामाजिक संस्था आरमोरी यांच्या वतीने मौजा रवी येथील युवकांना स्पर्धा परीक्षेच्या पुस्तकांचे वितरण करण्यात आले. आरमोरी तालुक्यातील मौजा रवी हे जंगलाने वेढलेले एक छोटेसे गाव आहे. वाघाची दहशत असल्यामुळे येथील तरुण पोलिस भरती, वनरक्षक भरती तसेच विविध परीक्षेच्या शारीरिक परीक्षेच्या तयारीसाठी बाहेर ग्राऊंडवर जाण्यास घाबरत होते. तेथील तरुणांची समस्या लक्षात घेऊन युवामंच सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी रवी येथे गावालगतच पोलिस भरतीच्या शारीरिक परीक्षेच्या सरावासाठी ग्राउंड तयार करून दिले तसेच त्या ग्राऊंडवर व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून दिले तसेच ग्राऊंडवर सकाळीं आणि उशिरा सायंकाळी अंधार राहत असल्यामुळे लाईटची व्यवस्था देखील करून दिली. आणि प्रंचित सावकार पोरेड्डीवार साहेब यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून तेथील गरीब विद्यार्थ्यासाठी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अश्या पुस्तकांची भेट दिली. आणि त्या होतकरू तरुणांना पुन्हा कोणत्याही गोष्टीची गरज भासल्यास युवामंचचे सदस्य नेहमी त्यांच्या सोबत असणार आणि ती समस्या दूर करणार अशी ग्वाही युवामंच च्या सदस्यांकडून रवी येथील तरुणांना देण्यात आली. यावेळी युवामंचचे, पंकज खरवडे, अमोल खेडकर, युगल सामृत्वार, गुलाब मने, जितु ठाकरे, नंदू नाकतोडे तसेच गावातील विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.





  Print






News - Gadchiroli




Related Photos