महत्वाच्या बातम्या

 फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली रा.से.यो. विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीराअंतर्गत श्रमदानातून तलाव खोलीकरण


- वनराई बंधारा, नव मतदार नोंदणी शिबीर, कॅन्सर आणि आरोग्य विषयावर मार्गदर्शन अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : श्री साईबाबा ग्रामीण विकास संस्था गडचिरोली द्वारा संचालित फुले - आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली सत्र २०२२-२०२३ चे विशेष श्रमसंस्कार व ग्रामीण शिबीर ६ फेब्रुवारी २०२३ ते १२ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मौजा जांभळी या गावात आयोजित करण्यात आले असून शिबिराच्या चौथ्या दिवशी ९ फेब्रुवारी २०२३ रोजी श्रमदान अंतर्गत तलाव खोलीकरण तथा वनराई बंधारा बांधण्याचे काम शिबिरार्थींनी पार पाडले. यावेळी ग्रामस्थ तसेच विलास कुमरे सरपंच ग्राम पंचायत जांभळी हे उपस्थित होते. 

बौद्धिक सत्रामध्ये माझे मतदान माझा आधीकार आणि कर्तव्य या विषयावर मार्गदर्शन तथा नव मतदार नोंदणी शिबीर आयोजित करण्यात आले. यासाठी मार्गदर्शक म्हणून तहसील कार्यालय धानोरा येथील निवडणूक विभागातील असिस्टंट आशिक मडावी हे उपस्थित असून त्यांनी माझे मतदान माझा अधिकार आणि कर्तव्य या विषयावर सखोल असे मार्गदर्शन केले. तसेच नव मतदार नोंदणी शिबिरासाठी साईनाथ कुंबरे महसूल सहाय्यक निवडणूक तहसील कार्यालय धानोरा हे उपस्थित होते. या नवमतदार नोंदणी शिबिरात ३० नव मतदारांची नोंदणी करण्यात आली.

सोबतच शिबिरात कॅन्सर मुक्ती प्रबोधन यात्रेअंतर्गत आरोग्य आणि कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन पर सत्र आयोजित करण्यात आले. यासाठी प्रथम संस्था अहमदनगर चे काकडे तथा आम्ही आमच्या आरोग्यासाठी चे डॉ. सतीश गोगुलवार हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित असून कॅन्सर म्हणजे कॅन्सल नाही, यातून बरे होणे शक्य आहे, असे मनोगत व्यक्त केले. तसेच विविध कॅन्सर योध्यानी आपले मनोगत यावेळी व्यक्त करून ग्रामस्थ तथा शिबिरार्थ्यांना प्रोत्साहित केले. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाच्या प्राध्यापिका शिबिर समन्वय कु. प्रा.सरिता बुटले या उपस्थित असून त्यांनी आपले अध्यक्ष भाषणात मतदान हा आपले अधिकार आहे आणि तो आपण बजावलाच पाहिजे तसेच. आपल्या आरोग्याची निगा राखली तरच आपण परिवाराची निगा राखू शकतो.  आपल्या परिवारासाठी आपणच सर्वस्वी असतो, म्हणून चुकीच्या सवयी लाऊन न घेता आरोग्यदायी आहार घेऊन निरोगी जीवन जगावे, असे मत व्यक्त केले .

या कार्यक्रमाचे सूत्र संचालन प्रा.दिपक तायडे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रवीण टेकाम या शिबिरार्थीने केले.

  Print


News - Gadchiroli
Related Photos