३० सप्टेंबरपर्यंत करा पॅन - आधार लिंक, अन्यथा १ ऑक्टोबरपासून पॅनकार्ड होणार निष्क्रिय


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :  पॅनकार्ड आणि आधारकार्ड लिंक करण्यासाठी केंद्र सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत पॅन क्रमांक आधार क्रमांकाशी न जोडल्यास १ ऑक्टोबरपासून  पॅनकार्ड  'इन-ऑपरेटिव्ह'  ठरणार आहे.  जोपर्यंत पॅनकार्ड आधारशी लिंक करीत नाही तोपर्यंत ते वापरता येणार नाही. 
 केंद्र सरकारने इन-ऑपरेटिव्ह म्हणजे नेमके काय हे स्पष्ट केलेले नाही. जुलै २०१९ मध्ये सादर केलेल्या अर्थसंकल्पात पॅन-आधार लिंक करण्याच्या नियमांत बदल केले होते. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने ३१ मार्च रोजी पॅन क्रमांक आधारशी लिंक करण्यासाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली होती. यापूर्वीही पॅन क्रमांक दिलेल्या मुदतीत आधार क्रमांकाशी लिंक केला नाही तर पॅनकार्ड इनव्हॅलीड मानले जाईल, असा नियम होता.पॅनकार्ड इन-ऑपरेटिव्ह झाल्यास पॅनकार्ड आवश्यक असलेल्या ठिकाणी आर्थिक व्यवहार करता येणार नाही. म्हणजेच अर्थकरदाते पॅनकार्डचा वापर करू शकणार नाहीत.
  Print


News - World | Posted : 2019-09-26


Related Photos