महत्वाच्या बातम्या

 आज पासून दहावीच्या परीक्षेला सुरुवात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी पासून सुरू झाली असून आज पासून दहावीच्या परीक्षा सुरुवात होत आहे. बल्लारपूर तालुक्यातील ८ केंद्रावर दहावीची परीक्षा होत आहे.

बल्लारपूर तालुक्यात ८ केंद्र असून १ हजार १४३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. तालुक्यात गोपाळ वानखेडे विद्यालय नांदगाव पोडे, जनता विद्यालय कोठारी, कर्मवीर विद्यालय येनबोडी, जनता विद्यालय सिटी ब्रांच बल्लारपूर, जव्हेरी कन्या विद्यालय बल्लारपूर, बालाजी विद्यालय बामणी बल्लारपूर, दिलासाग्राम कॉन्व्हेन्ट बल्लारपूर, जनता विद्यालय डेपो ब्रांच बल्लारपूर या केंद्रावर परीक्षा होत आहे. यंदा कॉपीमुक्त परीक्षा व्हावी, याकरीता शिक्षण विभागसह जिल्हा प्रशासनाने लक्ष केंद्रित केले आहे. तालुक्यात बारावीचे ५ केंद्र असून १ हजार ४५७ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. 

यावर्षी बारावी, दहावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी शिक्षण विभाग, महसूल विभागाने विविध पथक गठित केले आहे.

  Print


News - Chandrapur
Related Photos