महत्वाच्या बातम्या

 विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात मराठी रंगभूमी दिन साजरा             


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
वृत्तसंस्था / अमरावती : ५ नोव्हेंबर हा मराठी रंगभूमी दिन संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रादर्शिक कला विभागात नुकताच साजरा करण्यात आला.  याप्रसंगी कुलगुरू डॉ. दिलीप मालखेडे, प्र - कुलगुरू डॉ. विजयकुमार चौबे, कुलसचिव, डॉ. तुषार देशमुख यांनी कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्यात.
रंगभूमी दिनानिमित्ताने विभागाचे समन्वयक रमेश जाधव यांनी प्रथम व तृतीय सत्राच्या विद्याथ्र्यांना नृत्य, नाट्य शास्त्राचे महत्व आणि अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर रोजगाराच्या संधी याबाबत माहिती देऊन विद्याथ्र्यांनी या क्षेत्राकडे वळावे व अभिनयाद्वारे आपले अभिनयकौशल्य दाखवावे असे आवाहन केले. नाट¬शास्त्र विभागाचे प्रा. डॉ. अनंत देव, प्रा. डॉ. मनोज उज्जैनकर, नृत्यशास्त्राचे डॉ. मोहन बोडे यांनीही विद्याथ्र्यांना मराठी रंगभूमी दिनानिमित्त कौमुदी महोत्सव, विश्व स्वप्न एकांकिचे सादरीकरण, संहिता वाचन याविषयी मार्गदर्शन केले. डॉ. मोहन बोडे यांनी नटराज मुद्रानृत्य, कु. वैभवी बोडे हिने दुर्गास्त्रोत्र नृत्य, तर निलेश ददगाळ याने नाट्य स्वागत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय शेंडे, सूत्रसंचालन सुवर्णा गाडगे यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. मनोज उजैनकर यांनी केले. केले. कार्यक्रमाला नाट्य व नृत्यशास्त्र विभागातील विद्यार्थी मोट्या संख्येने उपस्थित होते.





  Print






News - Rajy




Related Photos