महत्वाच्या बातम्या

 चंद्रपूरातील महिला रमल्या आठवणींच्या गावात


- आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने 17 पारंपारिक खेळांचे आयोजन, तिन हजार महिलांनी घेतला सहभाग 

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : श्री माता महाकाली क्रीडा महोत्सवा अंतर्गत आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने आझाद बागेत चला आठवणीच्या गावात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत महिलांसाठी 17 जुने पारंपारिक खेळ घेतल्या गेले. बालपणीच्या या खेळांमध्ये महिला चांगल्याच रमल्या. जवळपास तिन हजार महिलांनी या खेळात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमाला किशोर जोरगेवार, कल्याणी जोरगेवार, भावना पालीवाल, डॉक्टर नियाज खान, ममता मुंदडा, राजश्री गौरकार, वंदना हातगावकर यांच्यासह इतर माण्यवरांची मंचावर उपस्थिती होती.

आमदार किशोर जोरगेवार यांच्या वतीने श्री माता महाकाली महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यात विशेष महिलांसाठी 17 जुन्या पारंपारिक खेळांचे आयोजन आझाद बागेत घेण्यात आले. यात मामाच पत्र हरपल, लगोरी, लिंबु चम्मच, संगीत खुर्ची, रस्सा खेच, लंगडी, पिंकी -पिंकी व्हाट कलर, साखळी खेळ, फुगडी, बेडुक उडी, तीन पायाची लंगडी, टोपी संगीत खेळ, पोता उडी, बटाटा रेस, तळ्यात - मळ्यात, चिकट मासा आदी खेळांचा समावेश करण्यात आला होता. आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतुन आयोजित या खेळांना महिलांंचाही उत्स्फृत प्रतिसाद मिळाला. यात जवळपास तिन हजार महिलांनी सहभाग घेत हरविलेल्या जुन्या खेळांचा मनसोक्त आनंद घेतला. महिला संसार सांभाळत असतांना स्वतासाठी जगत नाही. त्यामुळे एक दिवस त्यांनी स्वतःसाठी जगत बालपणीच्या आनंददायी आठवणीत जगावे, त्यांच धाडस वाढाव या हेतुने आपण चला आठवणीच्या गावात ही संकल्पना सुरु केली आहे. यात आम्हाला महिलांचा अप्रतिम प्रसिसाद लाभला आहे. दरवर्षी आपण आता या याचे आयोजन करणार असल्याचे यावेळी आमदार किशोर जोरगेवार म्हणाले. या स्पर्धांमध्ये आमदार किशोर जोरगेवार यांच्या पत्नी कल्याणी किशोर जोरगेवार यांनीही सहभाग घेतला होता. स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते आकर्षित पुरस्कार देत सन्मानीत करण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्र - संचालन सरोज चांदेकर, प्रज्ञा जीवनकर यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी यंग चांदा ब्रिगेडच्या महिला आघाडीने अथक परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos