महत्वाच्या बातम्या

 ब्रम्हपुरी : अलंकार सिनेमागृह जळून खाक, लाखो रुपयांचे नुकसान


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / चंद्रपूर : ब्रम्हपुरी तालुक्यातील एकमेव सिनेमागृह शहरातील आरमोरी मार्गावर आहे. गुरुवारी रात्रीच्या सुमारास आग लागून संपूर्ण सिनेमागृहातील साहित्य जळून खाक झाले. समोरील लोखंडी दार कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आत जाण्यासाठी दुसरा मार्ग नाही.

माहितीनुसार सकाळी १०:०० वाजताच्या सुमारास येथील कर्मचाऱ्यांनी दार उघडून आत प्रवेश केला असता सदर प्रकार निदर्शनात आला. संपूर्ण खुच्या, मशीन, पडदा, पडद्यामागील साऊंड, इलेक्ट्रिक साहित्य पूर्णतः जळून खाक झाल्याने मालकाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 





  Print






News - Chandrapur




Related Photos