आमदार डॉ. देवराव होळी यांच्या पुढाकाराने वाळके , गट्टीवार यांचे आमरण उपोषण मागे


- संबंधित ग्राम सचिवास तात्काळ निलंबित करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा : उपोषणकर्त्यांची मागणी 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
चामोर्शी येथील पंचायत समिती समोर आमगाव महाल येथील सामाजिक कार्यकर्ते नाजूक वाळके व बाबुराव गट्टीवार यांनी ग्राम पंचायत आमगाव, कुनघाडा व चामोर्शी येथील विकासाच्या लोकाभिमुख योजनेत तत्कालीन ग्राम विकास अधिकारी  प्रदीप भांडेकर यांनी आर्थिक गैरव्यवहार केल्याने रक्कम वसुलीसह फौजदारी कार्यवाही करण्याच्या मागणीसाठी आमरण उपोषण सुरु केले होते. यामधील वयोवृद्ध उपोषणकर्ता बाबुराव गट्टीवार यांची प्रकृती खालावल्याने याची दखल घेऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी संवर्ग विकास अधिकारी प.स. गडचिरोली यांच्या दालनात तहसीलदार, संवर्ग विकास अधिकारी व पोलीस निरीक्षक यांच्या उपस्थितीत समस्त विषयांवर चर्चा केली. यानंतर उपोषण कर्त्यांशी चर्चा करून उपोषण सोडविले आहे. 
  वारंवार उपोषण करूनही प्रशासनाने योग्य कारवाही न केल्याचे आश्चर्य व्यक्त केले व नाजूक वाळके व बाबुराव गट्टीवार यांच्या मागणीची  सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश आमदार डॉ. देवराव होळी यांनी दिले. प्रकृती खालावल्याने भर्ती झालेल्या उपोषण कर्त्यांची व दुसऱ्या उपोषणकर्त्यांची आमदार यांनी समजूत घातली व  प्रशासनाच्या वतीने तात्काळ चौकशी करून संबंधित गैरव्यवहार करणाऱ्या ग्राम सचिवांवर कारवाई करण्याची मागणी व योग्य न्याय देण्याचे आश्वासन यावेळी आमदार डॉ. होळी यांनी दिली. 
प्राथमिक आरोग्य केंद्रात  भरती असलेले  उपोषणकर्ता बाबुराव गट्टीवार यांना निंबूपाणी पाजून आमदार डॉ. देवराव होळी यांनी उपोषण सोडविले. यावेळी भाजप तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, माणिक कोहळे, जयराम चलाख, साईनाथ बुरांडे, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-08-23


Related Photos