महत्वाच्या बातम्या

 माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या उपस्थितीत निघणार अहेरी ते आलापल्ली स्वातंत्रवीर सावरकर गौरव यात्रा


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
तालुका प्रतिनिधी / अहेरी : भारतीय जनता पार्टी स्थापना दिन ६ एप्रिलला गुरुवारी सकाळी १०:०० वा. माजी पालकमंत्री राजे अम्ब्रीशराव आत्राम यांच्या प्रमुख उपस्थितीत निघणार भाजपा जनसंपर्क कार्यालय, राजवाडा रोड, अहेरी समोर ध्वजारोहण करून भाजपा अहेरी तालुका तर्फे अहेरी ते आलापल्ली भव्य विर सावरकर गौरव यात्रा काढली जाणार आहे.

कांग्रेस नेते राहुल गांधी यांच्याद्वारे स्वातंत्र्यविर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वारंवार चुकीची टिप्पणी करून त्यांचे मुद्दामहून अपमान केले जात आहे. यांच्या निषेधार्थ पूर्ण महाराष्ट्र राज्यात भाजपा शिवसेना महायुती तर्फे असे सावरकर गौरव यात्रा काढली जात असून अहेरी ते आलापल्ली पर्यंत निघणाऱ्या भव्य गौरव यात्रेत राष्ट्रभक्त जनतेनी तसेच भाजपा शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन भाजपा अहेरी तालुकाध्यक्ष रवी नेलकुद्री यांनी केले आहे.

  Print


News - Gadchiroli
Related Photos