गडचिरोली ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभा आज


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
जिल्हा ग्रंथालय व शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २० व २१ डिसेंबरदरम्यान ग्रंथ महोत्सवाचे आयोजन्न करण्यात आले असून या महोत्सवाच्या नियोजनाबाबत सभेचे आयोजन आज  १९ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हा परिषद हायस्कूल गडचिरोली येथे करण्यात आली आहे.
ग्रंथ महोत्सवाच्या नियोजनासाठी ही सभा घेतली जाणार आहे. दोन दिवस चालणारे महोत्सव यशस्वीरित्या पा पाडण्यासाठी त्याचे नियोजनासाठी सर्व समित्यांची आढावा बैठक घेतली जाणार आहे. सभेला सर्व समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी न चुकता उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ.सुरज मडावी व जि.प. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) रमेश उचे यांनी केले आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2018-12-19


Related Photos