महत्वाच्या बातम्या

 कृषि सहसंचालक यांचा एक दिवस बळीराजासोबत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / खाबांडा : वरोरा तालुक्यातील खाबांडानजिक असणाऱ्या कोसरसार येथे 25 डिसेंबर 20022 ला शेतकऱ्यांच्या मूलभूत समस्या जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांशी समरस होऊन संवाद साधण्याकरिता कृषि आयुक्तालय पुणे येथील कृषि सहसंचालक किरनळ्ळी यांचेसह कृषि उपसंचालक सराफ यांनी भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेत एक दिवस बळीराजा सोबत घालविला.

खांबाडा परिसरातील लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनी या कंपनीला कोसरसार येथे भेट देऊन कंपनीचे संचालक मंडळ तथा शेतकऱ्यांशी संवाद साधत शेतीतील मूलभूत समस्या जाणून घेतल्या व समाधान केले. लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनी ची वाटचाल, शेतकरी हितार्थ स्मार्ट अंतर्गत योजना, हळद मूल्यवर्धन इ. विषयावर सविस्तरपणे शेतकऱ्यांशी चर्चा झाली. प्रसंगी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालय चंद्रपूर चे कृषि उपसंचालक मनोहर यांनी स्मार्ट प्रकल्पाची व्याप्ती व शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत शेतकऱ्यांकरिता उपलब्ध करावयाच्या सोयी सुविधा याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तालुका कृषि अधिकारी भोयर यांनी कृषीविषयक विविध योजनांविषयी सविस्तर माहिती देत शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या. 

शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून उत्पादित मालाचे मूलवर्धन करून अधिक नफा मिळवावा असे मत किरनळ्ळी, कृषि सहसंचालक, फलोत्पादन यांनी व्यक्त केले. सराफ, कृषि उपसंचालक तथा पालक अधिकारी चंद्रपूर यांनी लभान सराड शेतकरी उत्पादक कंपनीची शेतकरी हितार्थ वाटचाल बघून समाधान व्यक्त केले. 

प्रसंगी मंडळ कृषि अधिकारी प्रगती चव्हाण, कंपनीचे अध्यक्ष डॉ. राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी खोब्रागडे, लेखापाल कोसुरकर व सर्व संचालक मंडळ यांचेसह शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन डोंगरकार, कृषि पर्यवेक्षक यांनी केले तर आभार प्रदर्शन वाघ, कृषि सहायक यांनी केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos