उच्च शिक्षणातील बदल काळाची गरज : कुलगुरू डॉ. कल्याणकर


- श्री शिवाजी महाविद्यालयात सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमावर आधारित विद्यापीठस्तरीय कार्यशाळा  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / राजुरा :
भारतीय शिक्षण पद्धतीमध्ये ज्या काही सुधारणा होऊ घातल्या आहेत त्याची सर्वस्वी माहिती शिक्षण क्षेत्रातील सर्व तज्ञ मंडळी, उच्च शिक्षण क्षेत्रात काम करणारे सर्व प्राध्यापक, तथा महाविद्यालयीन शिक्षण घेणारे सर्व विद्यार्थी यांना या नवीन बदलत्या शिक्षण प्रणालीचे ज्ञान असणे गरजेचे आहे असे प्रतिपादन  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. नामदेवराव कल्याणकर यांनी केले.
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली संलग्नित श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा जिल्हा चंद्रपूर येथे काल २९  जुलै रोजी  राज्यशास्त्र, इतिहास, गृह अर्थशास्त्र विषयाच्या बी.ए. सत्र पाच व सहा च्या सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमावर आधारित एक दिवसीय विद्यापीठ स्तरीय कार्यशाळेचेआयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उद्घाटक म्हणून  गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू  डॉ. नामदेवराव कल्याणकर बोलत होते. 
 प्रमुख अतिथी  म्हणून गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे  मानव्यविद्या विद्याशाखा  अधिष्ठाता   डॉ. श्रीराम कावळे  होते.  अध्यक्ष स्थानी  आ.शि. प्र. राजुरा चे सचिव  अविनाश जाधव यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली.
डॉ. श्रीराम कावळे यांनी आपल्या मनोगतात महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम २०१६ नुसार संपूर्ण महाराष्ट्रात सी.बी.सी.एस. शिक्षण पद्धती स्वीकारली असून गोंडवाना विद्यापीठ त्यामध्ये अग्रगण्य आहे या सी.बी.सी.एस. प्रणालीनुसार जे बदल झालेले आहेत त्या बदलाची माहीती प्राध्यापक तथा विद्यार्थ्यांना होणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
अध्यक्षीय मनोगतात  अविनाश जाधव यांनी आम्हच्या महाविद्यालयामार्फत उच्च शिक्षणाच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रम राबविले जातात व त्याचा फायदा या परिसरातील सर्व गोरगरीब विद्यार्थ्यांना होत असल्याचे प्रतिपादन केले.
या कार्यशाळेला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालयातील राज्यशास्त्र, इतिहास व गृहअर्थशास्त्र विषयाचे सर्व प्राध्यापक उपस्थित होते.  कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रात महाविद्यालयातील वेगवेगळ्या हॉल मध्ये तीनही विषयाच्या बी.ए. अंतिम वर्षाच्या पाचव्या व सहाव्या सत्राच्या सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमावर चर्चा  करण्यात आली.
यावेळेस इतिहास विषयाच्या अभ्यासक्रमावर चर्चा महाविद्यालयातील मा.पतींगराव सभागृहामध्ये घेण्यात आली. या दुसऱ्या सत्राचे अध्यक्ष म्हणून शिवाजी महाविद्यालय गडचिरोली चे प्राचार्य डॉ. भुपेश चिकटे, मार्गदर्शक म्हणून डॉ. राजू किरमिरे कार्यकारी अध्यक्ष इतिहास अभ्यासमंडळ गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रकाश शेंडे सदस्य विद्वत सभा  गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली तसेच इतिहास अभ्यासमंडळाचे सदस्य डॉ. कामडी, डॉ. बेलोरकर, डॉ. आदे, डॉ. बोधाने इ. उपस्थित होते. अभ्यासक्रम कसा असावा सोबतच  काळानुसार भविष्यात  अभ्यासक्रमात कोणते बदल करता येईल यावर प्रदीर्घ चर्चा झाली.  राज्यशास्त्र अभ्यासमंडळाची सत्र दोन चे अध्यक्ष डॉ. संजय गोरे, प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. राजेंद्र मुद्दमवार,तसेच विशेष अतिथी म्हणून डॉ. प्रमोद शंभरकर व अभ्यासमंडळाचे सदस्य उपस्थित होते. यामध्ये डॉ. राजेंद्र मुद्दमवार यांनी बी.ए. सत्र पाच व सहा मध्ये झालेल्या बदलाविषयी तथा प्रकल्प विषयची सविस्तर माहिती दिली. 
गृह अर्थशास्त्र अभ्यासमंडळाचे अध्यक्ष डॉ. लता सावरकर  यांनी सी.बी.सी.एस. अभ्यासक्रमाची माहिती दिली. या सत्राचे अध्यक्ष म्हणून डॉ. सरोज झंझाड, डॉ. वनिता वंजारी उपस्थित होते. उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड, डॉ. टी.सी. जोसेफ तसेच कार्यशाळेचे समन्वयक डॉ. राजेंद्र मुद्दमवार, प्रा. गुरुदास बल्की, डॉ. वनिता वंजारी तथा महाविद्यालयीन प्राध्यापक वृंद तथा शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अथक परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाचे संचालन डॉ. संजय लाटेलवार यांनी केले तर आभार डॉ. वनिता वंजारी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

   Print


News - Chandrapur | Posted : 2019-07-30


Related Photos