महत्वाच्या बातम्या

 गडबोरी येथे महर्षी वाल्मिकी ऋषी मूर्तीचे अनावरण


- दोन दिवसीय कार्यक्रमात विविध स्पर्धेचे आयोजन

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / सिंदेवाही : रामायणाचे रचनाकार म्हणून प्रख्यात असलेले महर्षी वाल्मिकी ऋषी यांच्या मूर्तीचे अनावरण नुकतेच गडबोरी येथील ढीवर समाज संघटना यांचे वतीने करण्यात आले असून या मूर्तीचे अनावरण ग्राम पंचायत सरपंच अरविंद मेश्राम यांचे हस्ते करण्यात आले. 

जे आदिकवी म्हणून प्रसिद्ध होते. रामायण एक महाकाव्य आहे. जे श्रीराम यांच्या जीवनातून आपणास जीवनातील सत्य, कर्तव्य, साहस, यांचा परिचय देते, आणि आदर्श जीवन जगण्यास मार्गदर्शन करते. रामाचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आयुष्याची वाटचाल केली. राम सीता सारखे आदर्श व्रत होऊन समाजात सन्मानाने जगता येईल. अशा आशादायी विचारांची पेरणी करून महर्षी वाल्मिकी यांनी उद्याचा नवा सूर्य दाखविला. असे उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले. दोन दिवसीय या कार्यक्रमात सकाळी गावातून महर्षी वाल्मीक यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. व त्यानंतर दुपारी संघर्ष वाहिनी संघटना अध्यक्ष दीनानाथ वाघमारे यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. 

यावेळी मान्यवर म्हणून खडसंगी येथील प्रा. मेश्राम, शंकरापुर येथील प्रा. वाघधरे, एकलव्य सेना अध्यक्ष प्रकाश नान्हे, सर्वोदय महाविद्यालयाचे प्राचार्य राजेश डहारे, ढीवर समाज संघटना तालुका अध्यक्ष अरुण साहरे, सिंदेवाही न.प. नगरसेविका मीनाक्षी मेश्राम, ग्राम पंचायत सरपंच शीतल उपरकर, तंटा मुक्त समिती अध्यक्ष दिनेश पातरे, ग्राम पंचायत सदस्य विलास शेंडे, प्रशांत मेश्राम, पौर्णिमा मोहुरले, कुंदा बनकर, समीक्षा वसाके, सुषमा मेश्राम, ग्रामसेवक अतुल मेश्राम, इत्यादी मंचावर उपस्थित होते. 

त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे विदर्भ संघटक हरि पाथोडे यांचा अंधश्रद्धा निर्मुलनाचा कार्यक्रम घेण्यात आला. दुसऱ्या दिवशी सकाळी विविध स्पर्धा घेऊन दुपारी शिवापूर बंदर येथील महिला मंडळांनी आणि पुरुषांनी भजन सादर केली. सायंकाळी स्नेहाभोजन करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ढिवर समाज संघटना येथील सर्व पुरुष महिलांनी परिश्रम घेतले.





  Print






News - Chandrapur




Related Photos