वडगाव येथील इसमाचा तलावात बुडून मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / सडक अर्जुनी : 
घरचे गुरे गावाशेजारच्या तलावामध्ये धुण्याकरिता गेलेल्या इसमाचा खोलीकरण झालेल्या तलावात बुडून मृत्यू झल्याची घटना तालुक्यातील वडगाव येथे आज १० नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास घडली.  दुलीचंद तरोणे (४८) असे मृत इसमाचे नाव आहे . 
आज सकाळी आठ वाजता दुलीचंद तरोणे घरचे गुरे गावाशेजारच्या तलावामध्ये धुण्याकरिता गेले असता तलावातील खोलीकरण झालेल्या खड्यात पाय घसरून पडल्याने त्याचा तलावात बुडून मृत्यू झाला . त्यांच्यामागे पाठीमागे बराच मोठा आप्तपरिवार आहे. शवविच्छेदनाकरिता  ग्रामीण रुग्णालय सडक अर्जुनी येथे ठेवण्यात आलेला आहे . पुढील तपास डुगीपार पोलीस करीत आहेत.  Print


News - Gondia | Posted : 2018-11-10


Related Photos