महत्वाच्या बातम्या

 अंगणवाडी कर्मचा-यांचा प्रश्न लोकसभेत उपस्थित करणार : खासदार रामदास तडस


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती व्दारा अंगवाडी सर्व कर्मचा-यांचे विविध मागणी करिता तसेच बेमुदत संप सुरु असुन आमच्या मागण्या शासनस्तराव मांडाव्या या करिता वर्धा लोकसभा मतदार संघाचे खासदार रामदास तडस यांची वर्धा येथील जनसंपर्क कार्यालया येत अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीचे शिष्टमंडळांनी भेट घेऊन मागणी केली. यावेळी जिल्हा प्रकल्प अध्यक्ष, जिल्हा प्रकल्प सचिव, देशकर तसेच ललीता मुनेश्वर, सारकर, छाया तिरपुडे, रेखा बोरकर तसेच मोठया संख्येन अंगवाडी सेविका उपस्थित होत्या.

अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढ, नविन मोबाईल व टॅब, न्यायालयीन आदेशानुसार ग्रज्युईटी, सेवासमाप्ती एकरकमी लाभ देणे, किरकोळ खर्चामध्ये वाढ, आहारात दरात वाढ करणे, अंगणवाडयाचे  भाडे वाढ, अंगणवाडी सेविका व मदतनिस यांची रिक्त पदे भरणे, मिनी अंगणवाडीचे अंगणवाडीत रुपातंर करणे, गणवेश रक्कम वाढविणे, अंगणवाडयांना मिळणारे साहित्य नियमीत देणे, निवृत्त झालेल्या अंगवाडी सेविकांची भरती 6 महिणे अगोदर करणे, केन्द्रसरकारने महागाई भत्त्यामध्ये नियमीत वाढ करावी.

आजारासाठी रजा मंजुर करणे, अंगणवाडी कर्मचा-यांची कामाची नियमावली निश्चीत करणे इत्यादी विषयावर सर्व अंगणवाडी सेविकांनी खासदार रामदास तडस यांच्या सोबत सविस्तर चर्चा केली व आमच्या मागण्या शासन स्तरावर पाठपुरावा करण्याची मागणी केली. खासदार रामदास तडस यांनी त्यांच्या मागण्या सविस्तर पणे समजुन घेतल्या व महाराष्ट्र सरकार व केन्द्र सरकार कडे पाठपुरावा करण्याचे तसेच लोकसभा अधिवेशन मध्ये आपल्या केन्द्र सरकार कडे असलेल्या प्रलंबीत मागणी संदर्भात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे आश्वासन दिले.





  Print






News - Wardha




Related Photos