महत्वाच्या बातम्या

 पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व शासकीय औद्यौगिक प्रशिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन २० फेब्रुवारीला शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था हनुमान टेकडी, वर्धा येथे करण्यात आले आहे. 

या रोजगार मेळाव्यात उत्पादन व सेवा क्षेत्रातील कंपन्या सहभागी होणार आहे. मेळाव्यास उमेदवारांनी आपल्या कागदपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजता दरम्यान उपस्थित राहावे. तसेच शासनाच्या www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर जाऊन रोजगार हा पर्याय निवडावा, नोकरी इच्छुक उमेदवारांनी लॉगइन या सेक्शन ला जाऊन आपला सेवायोजन कार्डवरील नोंदणी  क्रमांक व पासवर्ड टाकून लॉग इन करावे. तसेच पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा हा पर्याय निवडून जिल्हा वर्धा  निवडावा व आपल्या शैक्षणिक आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार कंपनीची निवड करून अर्ज करावे.

रोजगार मेळाव्यात आपले पासपोर्ट फोटो व सर्व शैक्षणिक कागदपत्रांची झेरॉक्स घेऊन जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्तांनी केले आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तिसरा माळा, प्रशासकीय भवन, सिव्हिल लाईन वर्धा येथे संपर्क साधावा.





  Print






News - Wardha




Related Photos