लोकबिरादरी प्रकल्पात मधमाशी पालन प्रशिक्षण संपन्न/ प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भामरागड :
लघू व मध्यम उद्योग मंत्रालय, भारत सरकार द्वारा खादी व ग्रामोद्योग आयोग, विभागीय कार्यालय नागपूरच्या वतीने लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे पाच दिवसीय मधमाशी पालन प्रशिक्षण देण्यात आले. सहभागी प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले.
ग्रामीण भागातील लोकांना मधमाशी पालन क्षेत्रात रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने २०१७ पासून हनी मिशन कार्यक्रमांतर्गत अनेक राज्यांत मधमाशीपालनाचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. खादी व ग्रामोद्योग आयोग, विभागीय कार्यालय नागपूरच्या वतीने ९ ते १३ एप्रिल २०२२ पर्यंत पाच दिवसीय प्रशिक्षण लोकबिरादरी प्रकल्प हेमलकसा येथे बहुसंख्य लोकांना  देण्यात आले. १४ एप्रिल २०२२ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीचे औचित्य साधून मधमाशी पालन प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले व प्रशिक्षणाची सांगता करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून खादी व ग्रामोद्योग आयोगाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय हेडाऊ, विभागीय कार्यालय नागपूरचे निर्देशक राघवेंद्र महिंद्रकर, सहनिर्देशक राजेंद्र खोडके, लोकबिरादरी हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. दिगंत आमटे, प्रशिक्षक अमित कोहली, प्राचार्य डॉ. विलास तळवेकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.  Print


News - Gadchiroli | Posted : 2022-04-16
Related Photos